
Police arrest Fake Ias Officer for blackmailing shack and club owners in Calangute
पणजी/कळंगुट: कळंगुट परिसरातील शॅक्स तसेच क्लबचालकांना ‘आयएएस’ अधिकारी असल्याचे सांगून ब्लॅकमेल करणारा व त्यांची आस्थापने बंद करण्याची धमकी देणारा मनोज कुमार (वय ३१ वर्षे, रा. छत्तीसगड) याला कळंगुट पोलिसांनी अटक केली.
त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे असलेले आयएएस अधिकाऱ्याचे ओळखपत्र बनावट असल्याचे उघड झाले आहे. त्याला कळंगुट येथील एका हॉटेलमधून अटक केल्याची माहिती कळंगुट पोलिसांनी दिली. तोतया आयएएस अधिकारी मनोज कुमार हा यापूर्वी ५ डिसेंबर रोजी गोव्यात आला होता.
एक टॅक्सी भाडेपट्टीवर घेऊन एका हॉटेलमध्ये राहून गेला होता. त्यानंतर तो गोव्यातून निघून गेला आणि पुन्हा २० डिसेंबर रोजी गोव्यात आला, तेव्हा आपण ओडिशा येथील आयएएस अधिकारी असून लवकरच गोव्यात बदली होणार असल्याचे सांगत तो मोफत टॅक्सी सेवा घेत होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.