Ashwem Mandrem: आश्वेत बेकायदेशीर डोंगर कापणी! स्थानिकांची तक्रार; नोटिशीनंतरही काम सुरूच

Ashwem News: मांद्रे पंचायत क्षेत्रातील आश्‍वे या ठिकाणी सर्व्हे क्रमांक २२२/१बी या जागेत बेकायदेशीर डोंगर कापणी करून बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी पेडणे मामलेदार यांच्याकडे केली.

Mandrem Hill CuttingDainik Gomantak
Published on
Updated on

Ashwem Mandrem Construction With Illegal Hill Cutting News

मोरजी: मांद्रे पंचायत क्षेत्रातील आश्‍वे या ठिकाणी सर्व्हे क्रमांक २२२/१बी या जागेत बेकायदेशीर डोंगर कापणी करून बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी पेडणे मामलेदार यांच्याकडे केल्यानंतर मामलेदारांनी पेडणे उपजिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला.

उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी तातडीने दखल घेत हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित बंद करण्याचा आदेश दिला आणि संबंधितांनी पंधरा दिवसाच्या आत सर्वप्रकारची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस जारी केली. तरीही बांधकाम बंद करण्याऐवजी बांधकाम रात्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Ashwem News: मांद्रे पंचायत क्षेत्रातील आश्‍वे या ठिकाणी सर्व्हे क्रमांक २२२/१बी या जागेत बेकायदेशीर डोंगर कापणी करून बेकायदेशीर बांधकामे सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी पेडणे मामलेदार यांच्याकडे केली.
Lotulim Crime: गोव्यात धावत्या बसमध्ये युवतीचा विनयभंग! संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद

आश्‍वे येथील सर्व्हे क्रमांक २२२/१बी मधील बेकायदेशीर डोंगर कापणी करून बांधकाम करणे सुरू होते. पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी कायद्यानुसार नोटीस पाठवून जोपर्यंत कागदपत्रे सादर होत नाहीत, तोपर्यंत कुठल्यात कामाला सुरवात करू नये. काम बंद ठेवावे, असे आदेशात म्हटले होते आणि पंधरा दिवसाच्या आत सर्वप्रकारची कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला, असतानाही उलट काम बंद करण्याऐवजी संबंधितांनी मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेले आहे. ही जागा बिगरगोमंतकीयांनी विकत घेऊन कसल्याच प्रकारचे परवाने न घेता बांधकामे सुरू केलेली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com