Rvi Naik: पोलिस भरती घोटाळ्याबाबत विचारले असता कृषिमंत्री नाईक म्हणाले, मी गृहमंत्री असताना...

सध्याच्या भरतीबाबत मंत्री नाईक यांनी अधिक बोलणे टाळलं
 Ravi Naik
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्याने पोलिस भरतीत मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप आमदार विजय देसाई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणावरून पोलिस उपनिरीक्षक भरती रद्द करावी अशी मागणी करणार असल्याचं सरदेसाई म्हणाले होते. यावरुन आज राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी मी गृहमंत्री असताना कधीच घोटाळा झाला नाही असे म्हटले आहे.

(Agriculture Minister Ravi Naik was silent about the police recruitment scam)

 Ravi Naik
Goa Recruitment Scam : गोवा आरोग्य खात्यातील तब्बल 1245 जणांवर टांगती तलवार

पोलिस भरती घोट्याळ्याचा आरोपाबाबत नाईक यांना विचारले असता पोलिस भरती प्रकरणात गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना माहिती विचारावी लागेल, तसेच गृह खाते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे असल्याने ते याबाबत अधिक माहिती देऊ शकतील असं म्हणत कृषीमंत्री रवी नाईक यांनी पोलिस भरतीबाबत भाष्य करण्याचे टाळले.

 Ravi Naik
Corona Update: गोव्यात 15 नवे रूग्ण तर 7 कोरोनामुक्त

काय आहे नेमकं पोलिस भरती घोटाळा प्रकरण?

आमदार विजय सरदेसाई यांनी 15 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत गोव्यातील पोलिस उपनिरिक्षक भरती एक गुन्हेगारी कट असल्याचे आरोप केला. भरतीत ज्या उमेदवारांना 15 ते 30 गुण मिळाले आहेत. त्यांनी दुसऱ्या दिवशी पोलिस उपनिरिक्षक चाचणीत 83 ते 99 गुण मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात राजकीय नेते तसेच काही अधिकारी सहभागी असल्याची मला शंका आहे. असे ते म्हणाले.

दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी

पोलिस उपनिरिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी केली जावी, यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली जावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच, दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. आणि कारवाई केली नाही तर उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com