International Women's Day: आम्ही बी'घडलो, तुम्ही बी'घडा ना!

पाडेली प्रशिक्षणातून रोजगार उपलब्ध करून देणारी: श्‍वेता गावकर
International Women's Day
International Women's DayDainik Gomantak
Published on
Updated on

मनोदय फडते

सांगे: समाजानेही मान्य केलेले असते की काही गोष्टी अशा फक्त पुरूषच करू शकतात. खास करून जर ते काम खूप कठिण आणि मेहनतीचे असेल. पण नियमांनाही अपवाद असतात. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत आणि सर्वांनी तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या श्‍वेता गावकर हिने गोव्यातील नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कृषी पदवीधर असलेल्या श्‍वेताने स्वत:ही पाडेलीचे काम केले. आणि इतरांनाही प्रशिक्षण देत रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.

International Women's Day
गोव्यातील पहिली व्यावसायिक पायलट: रिचा गोवेकर

चोवीस वर्षीय श्‍वेता गावकरचे प्राथमिक शिक्षण नोंदुर्ले सांगे येथे झाले. दहावीपर्यंत युनियन हायस्कूल सांगेमध्ये पूर्ण केले. दहावीत 82 टक्के गुण मिळवून विज्ञान विषयात चंद्रभागा शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. आई-वडील मोलमजुरी करून आपल्या दोन्हीही मुलींना पदवीधर होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. श्‍वेताने त्यांचे स्वप्न पूर्ण करत बारावीत 70 टक्के गुण मिळवले. त्यानंतर राज्यात प्रथमच सुलकर्ण केपे येथे सुरू झालेल्या कृषी महाविद्यालयातून कृषी पदवीधर झाली. पण शासकीय नोकरीची प्रतीक्षा न करता कृषी क्षेत्रातील आणखीन माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला

International Women's Day
सुनिथ फ्रान्‍सिस रॉड्रिग्स यांच्‍यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

श्‍वेताने माडावर यांत्रिक पाडेलीचे प्रशिक्षण घेतले. केवळ प्रशिक्षण घेऊन न थांबता ती इतरांना प्रशिक्षण देण्याइतकी तरबेज झाली. माडावर चढून नारळाची ताडी काढण्यासाठीही रेंदेर हा दुर्मिळ होऊ लागला आहे. जिकरीचे आणि तितकेच कठीण काम सुद्धा श्‍वेताने लिलया आत्मसात केले आहे.

अनेक ठिकाणी नारळ पाडणे आणि ताडी काढण्याच्या कार्यशाळा भरवून श्‍वेता अनेकांना प्रशिक्षण देत आहे. तिच्या या धाडशीपणाचे अनेक संस्थांनी कौतुक करून सन्मान केला आहे. कृषी पदवीधर म्हणून शिक्षण पूर्ण केल्यानंतर बंगळूर येथील नामांकित कंपनीमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम केले. मात्र, कौटुंबिक कारणामुळे तिने ती नोकरी सोडून गोव्यातील कृष्णा प्लांटेशनमध्ये टेकनेशियन प्रमुख म्हणून काम केले. सध्या ती कोठारर्ली सांगे येथील तिंबलो ऍग्रो डेव्हलोपमेंट फार्ममध्ये फार्म इन्चार्ज म्हणून काम करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com