सुनिथ फ्रान्‍सिस रॉड्रिग्स यांच्‍यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

नरवणे यांची उपस्‍थिती: हिंदू पद्धतीनुसार मुलाने दिला मंत्राग्नी
Sunith Francis Rodrigues
Sunith Francis RodriguesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे सुपुत्र व देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) सुनिथ फ्रान्‍सिस रॉड्रिग्स यांच्‍या पार्थिवावर आज सोमवारी सांतिनेज-पणजी येथील मोक्ष स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्‍कार करण्‍यात आले. पहिल्‍यांदा ख्रिस्ती धर्माच्या परंपरेनुसार धर्मगुरूंद्वारे प्रार्थना करण्यात आली व त्यानंतर हिंदू परंपरेनुसार रॉड्रिग्‍स यांचे सुपुत्र नील, मार्क व कन्‍या सुझान यांनी मंत्राग्नी दिला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्‍यवर उपस्‍थित होते. भारतीय सैन्य दलातर्फे तोफांची सलामी देण्यात आली.

Sunith Francis Rodrigues
गोव्यातील पहिली व्यावसायिक पायलट: रिचा गोवेकर

आर्मी चीफ तथा सीडीएस एम. एम. नरवणे, गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला, निवृत्त जनरल जे. जे. सिंग, ॲडमिरल अरुण प्रकाश, सुरेश मेहता, के. बी. सिंग, माजी लेफ्टनंट जनरल अहलुवालिया, रोहित मोन्सेरात यांनी रॉड्रिग्‍स यांचे अंत्‍यदर्शन घेतले.

पूर्ण आयुष्‍य देशाला समर्पित: माजी लष्करप्रमुख सुनिथ फ्रान्‍सिस रॉड्रिग्‍स यांचा जन्म मुंबईत 1933 साली झाला. सैन्यात 41 वर्षे सेवा बजावून 30 जून 1993 साली ते निवृत्त झाले. तत्‍पूर्वी, 30 जून 1990 रोजी त्यांनी देशाचे सोळावे लष्करप्रमुख म्हणून धुरा सांभाळली. त्यानंतर नोव्हेंबर 2004 ते जानेवारी 2010 पर्यंत पंजाबचे राज्यपाल म्‍हणून कामगिरी बजावली. केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात चंदीगड येथे 200 हून अधिक सामाजिक उत्थानाच्या योजना राबविल्या गेल्‍या. ते सदोदीत देशासाठी समर्पित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com