Agonda Panchyat : आगोंद पंचायत क्षेत्रात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम संथगतीने

Agonda Panchyat : आगोंद पंचायत क्षेत्रातील रस्ते आधीच अरुंद आहेत. तीन वर्षांपूर्वीच मुख्य रस्त्याचे केलेले हॉटमिक्स डांबरीकरण एकदम खराब झालेले आहे.
Agonda Panchyat
Agonda PanchyatDainik Gomantak

Agonda Panchyat :

आगोंद, पंचायत क्षेत्रात भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ठिकठिकाणी रस्ते फोडून मातीचे ढिगारे टाकल्यामुळे वाहनचालकांना तर धुळीमुळे ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागतोय.

आगोंद पंचायत क्षेत्रात अजून मान्‍सूनपूर्व कामांना सुरूवात झालेली नाही. गटारांच्‍या स्‍वच्‍छतेकडेही कोणी लक्ष दिलेले नाही. पंचायत मंडळाच्या बैठकीत ठराव घेतल्यानंतरच ही कामे सुरू होतील, असे सरपंच प्रीतल फर्नांडिस यांनी सांगितले.

आगोंद पंचायत क्षेत्रातील रस्ते आधीच अरुंद आहेत. तीन वर्षांपूर्वीच मुख्य रस्त्याचे केलेले हॉटमिक्स डांबरीकरण एकदम खराब झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याकाठची माती खणली गेल्यामुळे पावसाळ्यात रस्ता खचण्याच्या घटना घडणार असल्याचे माजी सरपंच शाबा नाईक गावकर यांनी सांगितले.

Agonda Panchyat
GI Tag For Goa's Urrak: मानकुराद, फेणी, बिबिंकानंतर आता हुर्राकला लवकरच मिळणार GI मानांकन

केरी ते वैले आगोंद या दोन किलोमीटरपर्यंतच्या भागात भूमिगत वीजवाहिन्या घालायला साधारणपणे एक महिन्यापेक्षा जास्त अवधी लागला. ठेकेदारासाठी यावयाचे साहित्‍य पोहोचायला वेळ लागला असे कारण सांगितले गेले. भूमिगत वीजवाहिन्या घालण्याच्या कामात माती एका बाजूला टाकली जाते.

ती खूप दिवस तशीच ठेवल्यामुळे समस्या निर्माण होतात. आगोंद येथील एका दुचाकीस्‍वाराला अपघात होऊन तो गंभी जखमी झाला. सध्‍या त्‍याच्‍यावर मडगाव जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. शिवाय आगोंद हे पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी लहान-मोठे अपघात दररोज होतात. म्‍हणूनच लवकरात लवकर काम आटोपून रस्ता सुरळीत करण्याची मागणी या भागातून होत आहे.

Agonda Panchyat
IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

आगोंद पंचायत मंडळाची बैठक बुधवार दि. १५ मे रोजी होणार आहे. या बैठकीत मान्‍सूनपूर्व कामांबाबत ठराव घेण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. ४ जूनपर्यंत आचारसंहिता लागू असल्याने विकासकामांवर निर्बंध आलेले आहेत. त्‍यामुळे दि. ५ जूननंतरच खऱ्या अर्थाने विकासकामांना सुरूवात होईल.

- प्रीतल फर्नांडिस,

सरपंच (आगोंद)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com