GI Tag For Goa's Urrak: मानकुराद, फेणी, बिबिंकानंतर आता हुर्राकला लवकरच मिळणार GI मानांकन

GI Tag For Goa's Urrak: गोव्यात यापूर्वी मानकुराद, फेणी, बिबिंका, आगशीची वांगी आणि सातशिरांची भेंडी यांना GI मानांकन मिळाले आहे.
Goan Drink Urrak
Goan Drink Urrak Dainik Gomantak

GI Tag For Goa's Urrak

गोव्याचा प्रसिद्ध मानकुराद आंबा, खाद्यपदार्थ बिबिंका आणि काजूपासून निर्माण केल्या जाणाऱ्या फेणीला जीआय (जिओग्राफिकल आयडेंटिटी) मिळाल्यानंतर आता हुर्राकला लवकरच GI मानांकन मिळणार आहे.

वनविकास महामंडाळाच्या अध्यक्ष आणि पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. GI मानांकनाची प्रक्रिया सुरु झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काजूपासून घेतले जाणारे हुर्राक पेय अतिशय प्रसिद्ध असून, त्याची उन्हाळ्याच्या दिवसात खूप मागणी असते. गोवा सरकारच्या वतीने हुर्राकसाठी जीआय मानांकन मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती आमदार देविया राणे यांनी दिली आहे.

काजू आणि काजूसंबधित उत्पादनाबाबतच्या मान्यता बदलण्याची आवश्यकता असल्याचे मत राणे यांनी व्यक्त केले. काजू केवळ देशी उत्पादन किंवा गरीब माणसांचे पेय म्हणून ओळखले जाऊ नये. जागतिक स्तरावर त्याची एक उत्कृष्ट पेय म्हणून ओळख निर्माण व्हावी, फेणी आणि हुर्राक दोन्ही त्या क्षमतेची पेय असल्याचे देविया राणे म्हणाल्या.

Goan Drink Urrak
Parshuram Jayanti: प्रभू परशुरामाला गोमंतभूमी जनक का म्हटले जाते, काय आहे गोव्याशी संबंध?

हुर्राकला जीआय मानांकन मिळावे यासाठी आम्ही अर्ज केला असून, त्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आमदार देविया राणे यांनी दिली. मानांकन मिळाल्यानंतर हुर्राक बाटलीबंद विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे राणे म्हणाल्या.

पारंपरिक गोव्यातील काजूपासून दर्जेदार आणि शुद्ध हुर्राकची निर्मिती केली जाते. दुसरे कोणतेही राज्य हुर्राकची विक्री करु शकणार नाही, सध्या गोव्यात येणारी हुर्राक मिश्रित असल्याचे आमदार राणे यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com