milk
milkDainik Gomantak

इंधन दरवाढीनंतर 'गोव्यात' दुधाचे ही दर वाढले

अमूलनंतर गोकुळने वाढवले दर, गोवा डेअरीचाही दरवाढीचा प्रस्ताव
Published on

फोंडा: निवडणुका संपल्यानंतर आता इंधन दरवाढीची झळ जनतेला बसू लागली असतानाच सर्वसामान्यांच्या घरात कायम वापरल्या जाणाऱ्या दुधाचे दरही भडकल्याने आम आदमी हतबल झाला आहे. महिन्याभरापूर्वी अमूलच्या दरात लिटरमागे दोन रुपये वाढ झाल्यानंतर गोवा डेअरीनेही दूध दराचा प्रस्ताव सहकार निबंधकांकडे पाठवला. त्यातच महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या गोकुळ दुधाच्या दरात तीन रुपये प्रतिलिटर वाढ कालपासून लागू झाली आहे.

milk
Goa Updates: खातेवाटपाला पाडव्याचा मुहूर्त

महाराष्ट्र व कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या अन्य दूध डेअरीही दरवाढ करण्यास सरसावल्या असून नजीकच्या काही दिवसांत त्यांचेही दर वाढले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील दूध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या गोवा डेअरीने गुरुवारी घेतलेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत दूध उत्पादकांना प्रतिलिटरमागे दोन रुपये दरवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एका हाताने देताना दुसऱ्या हाताने ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी विक्री करण्यात येणाऱ्या दुधात प्रतिलिटर किमान दोन रुपये दरवाढ करण्याचा प्रस्तावही घेतला असून हे दोन्ही प्रस्ताव सध्या सहकार निबंधकांच्या टेबलवर आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर येत्या १६ तारखेपासून त्याची अंमलबजावणी होईल, हे नक्की.

राज्यात रोज 3 लाख लिटर दुधाची गरज

गोवा राज्याला रोज किमान 3 लाख लिटर दुधाची आवश्‍यकता भासते. रोजचे घरगुती ग्राहक तसेच हॉटेल व इतर व्यावसायिकांना, पर्यटक आस्थापनांना मिळून हे एकूण 3 लाख लिटर दूध लागते. मात्र, गोवा डेअरीकडून फक्त साठ हजार लिटरच्या आसपास दूध उपलब्ध केले जाते. त्यामुळे गोवा राज्याबाहेरून येणाऱ्या दूध डेअरी संस्थांचे फावले आहे.

milk
गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात?

सुरक्षेबाबत गोवा डेअरी आघाडीवर

राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाने देशभर केलेल्या एका सर्वेक्षणात गोव्यातील गोवा डेअरी आणि पॉंडिचेरी येथील दूध डेअरी अशा दोनच ठिकाणचे दूध सर्वांत जास्त सुरक्षित असल्याचा अहवाल आला होता. मात्र, दूध उत्पादन वाढीसाठी कोणकोणत्या क्लृप्त्या वापरल्या जातात, हे आता लपून राहिलेले नाही. भेसळयुक्त दुधामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाने गोवा डेअरीला दिलेला उत्तमतेचा दाखला हा गोव्यासाठी मानदंड ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com