गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात?

या परंपरेमागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक तथ्ये दडलेली आहेत.
gudi padawa
gudi padawa Dainik Gomantak

आज गुढीची पूजा केली जाते आणि खास पुरण पोळी खाल्ली जाते. या सणाशी संबंधित आणखी एक परंपरा आहे ती म्हणजे कडुलिंबाची पाने चावणे. ही एक अतिशय प्राचीन परंपरा आहे, जी आजही पाळली जाते. या परंपरेमागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक तथ्ये दडलेली आहेत. आयुर्वेदातही कडुलिंब अतिशय उपयुक्त मानला जातो. कडूलिंबाची पाने चघळल्याने अनेक फायदे होऊ शकतात. जाणून घ्या गुढीपाडव्याशी (Gudi Padwa) संबंधित या परंपरेचे कारण…

म्हणूनच खातात गुढीपाडव्याला कडुनिंबाची पाने

चैत्र नवरात्री दोन ऋतू (हिवाळा आणि उन्हाळा) यांच्या संगमात येते. यावेळी, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सामान्यतः थोडी कमी असते, ज्यामुळे विषाणूंशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो.

गुढीपाडव्याला किंवा चैत्र नवरात्रीत कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आयुर्वेदात कडुनिंब हे अनेक रोगांवर रामबाण औषध मानले जाते. याच्या पानांचे सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास मौसमी आजार, त्वचा समस्या, कफ इत्यादींवर फायदा होतो.

कडुलिंबामध्ये प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे अ आणि क इत्यादी खनिजे असतात.

हे सर्व घटक आपल्याला आजारी पाडणाऱ्या जंतूंना रोखतात. आपली प्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे शरीराला विषाणूजन्य तापाशी लढण्याची शक्ती मिळते.

ऋतूंच्या संगमामुळे या आजारांना आळा घालता येतो, त्यामुळे कडुलिंबाचे सेवन करण्याची परंपरा रूढ आहे.

या दिवसात शरीर निरोगी राहिल्यास पूजेत कोणतीही अडचण येत नाही. कोरोनाच्या काळातही ही परंपरा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

त्यामुळेच गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आपल्या ज्येष्ठांनी आणि ऋषीमुनींनी कायम ठेवली केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com