NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Supremo Sharad Pawar in Goa) गोव्यात दाखल झाले आहेत. काँग्रेस पक्षात झालेल्या मोठ्या बंडाळी नंतर पहिल्यांदाच शरद पवार गोव्यात आले आहेत. राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या बैठकीसाठी शरद पवार गोव्यात दाखल झाले आहेत. काँग्रेस बंडानंतर शरद पवारांच्या भेटीला विशेष महत्व आहे.
त्यानंतर शनिवारी सकाळी वेगुंर्ला (Vengurla) येथे एका पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
गोवा काँग्रेसमधील आठ आमदारांनी बंड करून भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांचा देखील सहभाग असल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. काँग्रेसच्या अकरा आमदारांपैकी आठ आमदार भाजपात गेल्याने गोव्यातील काँग्रेस कमजोर झाली आहे. यामुळे गोव्यातील सर्व प्रादेशिक पक्ष सक्रिय झाले आहेत.
काँग्रेस आमदारांच्या बंडामुळे गोव्यात एक राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. या राजकीय पोकळीचा फायदा घेण्याचा प्रयत्न सध्या विविध राजाकीय पक्ष घेताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्राईन सध्या गोव्यात तळ ठोकून आहेत. तसेच, आम आदमी पक्ष देखील कमालीचा सक्रिय झाला आहे.
गोव्यातील रिव्हूलशनरी गोवन्स आणि गोवा फॉरवर्ड देखील पक्षाचे स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शरद पवार गोव्यात आल्याने गोव्यात राष्ट्रवादी पक्षात काही बदल होणार का तसेच, पवार कार्यकर्त्यांना काय सुचना करणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.