Goa: प्रत्येकाने महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत- दिव्या राणे

Goa :पर्येत भाजपतर्फे स्वच्छता मोहीम आणि गरजूंना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले.
Goa | Divya Rane
Goa | Divya RaneDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Valpoi: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या विचार प्रत्येकांनी आत्मसात आणण्याची गरज आहे, असे आवाहन आमदार तथा गोवा वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. दिव्या राणे यांनी केले.

पर्ये मतदारसंघ भाजप मंडळाच्या वतीने आयोजित जयंतीनिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर, देवयानी गावस, विनोद शिंदे व इतरांची उपस्थिती होती. राणे म्हणाल्या, ‘समाजात मोठ्या प्रमाणात विषमता पसरली जात आहे.

Goa | Divya Rane
Goa Panchayat: आगोंद पंचायतीच्या विकासकामांसंदर्भात स्थानिकांची 'बैठक'

तसेच, यामुळे समाजाला अवस्थेत शास्त्री यांनी दिलेला जय जवान जय किसान यांचा नारा तर गांधी यांनी दिलेला सत्य व अहिंसेचा मार्ग प्रत्येकाने आत्मसात करावा.’ यावेळी राणे यांच्या हस्ते गरजूंना व्हिलचेअर प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रम झाल्यानंतर नागरिक व भाजप कार्यकर्त्यांनी कचरा गोळा करून तो वाळपई नगरपालिकेच्या स्वाधीन केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com