Dabolim Airport: प्रवासी वाढल्याने दाबोळी विमानतळावर अतिरिक्त टर्मिनल इमारत; 'या' दिवसापर्यंत पूर्ण होणार

क्षमता वाढणार; 132.6 कोटी रुपये खर्च
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport New Terminal Building: दाबोळी विमानतळावर नवीन अतिरिक्त टर्मिनल इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू असून ते 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या अतिरिक्त टर्मिनल इमारतीसाठीचा एकूण अंदाजे खर्च सुमारे 132.6 कोटी रुपये इतका आहे. प्रवासी वाहतुकीतील वाढ लक्षात घेऊन टर्मिनल इमारतीचे नियोजन करण्यात आले होते.

Dabolim Airport
Mahadayi Water Dispute: 'म्हादई'च्या मुद्यावरून भाजप कर्नाटकच्याच बाजुने? कळसा-भांडुरा प्रकल्प वेळेत पूर्ण करणार

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे विद्यमान आणि अतिरिक्त टर्मिनल इमारतीची क्षमता वाढविली जाणार आहे, अशी माहिती, दाबोळीच्या गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक एसव्हीटी धनंजय राव यांनी इंग्रजी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

विमानतळावरील पायाभूत सुविधा वाढवण्याचा एक भाग म्हणून, अतिरिक्त टर्मिनल इमारतीत प्रवाशांना सेवा देण्यासाठी दोन अतिरिक्त एरोब्रिजची योजना आहे. तिथे अधिक उड्डाणे सामावून घेतली जातील.

Dabolim Airport
Goa Traffic: वाहनधारकांनो लक्ष द्या! हेड कॉन्स्टेबल नव्हे तर केवळ 'हे' अधिकारीच जारी करू शकतात चलन...

फ्लाईट्सची नेमकी संख्या सांगता येणार नाही, पण दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणखी काही उड्डाणे अपेक्षित आहेत, असेही राव यांनी म्हटले आहे.

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या दररोज 158 उड्डाणे होत आहेत. या विमानतळावर सध्याच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये दररोज 4,450 प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता आहे. तर वर्षात येथे सुमारे 11.30 दशलक्ष प्रवासी येत असतात.

नव्या टर्मिनल इमारतीमुळे प्रवाशांना हाताळण्याची क्षमता तासाला 5150 इतकी वाढणार आहे. तर वार्षिक प्रवासी क्षमता 13.30 दशलक्ष प्रवासी इतकी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com