NH 748 four laning project: भोम-जुने गोवे मार्गाचा विस्तार अटळ, चौपदरीकरणासाठी आणखी घेणार 8863 चौ.मी. जमीन

NH 748 Land Acquisition: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ वरील भोम ते जुने गोवे या मार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आणखी ८,८६३ चौरस मीटर जमीन संपादित करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
NH 748 Land Acquisition
NH 748 four laning projectDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ वरील भोम ते जुने गोवे या मार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आणखी ८,८६३ चौरस मीटर जमीन संपादित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली असून संबंधित जमीनधारक व हितसंबंधितांना हरकती नोंदविण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

ही जमीन राष्ट्रीय महामार्ग ७४८ च्या कि.मी. १३५.०५० ते १४२.०५० या दरम्यानच्या भोम-जुने गोवे विभागाच्या चौपदरीकरणासाठी आवश्यक आहे. हा प्रकल्प ‘संमिश्र वार्षिक पद्धत’अंतर्गत राबविण्यात येणार असून वाहतूक सुलभ करणे, प्रवासाचा कालावधी कमी करणे आणि वाढत्या वाहनसंख्येला सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे.

NH 748 Land Acquisition
National Highway Accidents: राष्‍ट्रीय महामार्गांवर दिवसाला किती अपघात घडतात? मंत्री गडकरींनी उघड केली आकडेवारी

अधिसूचनेनुसार, प्रस्तावित संपादनाबाबत कोणत्याही व्यक्तीस किंवा जमीनधारकास हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात विशेष भूमी संपादन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग), आल्तिनो-पणजी यांच्या कार्यालयात सादर करावी लागणार आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत हरकती दाखल करणे बंधनकारक राहणार आहे.

संपादन प्रक्रियेदरम्यान प्राप्त होणाऱ्या हरकतींची सक्षम प्राधिकरणाकडून छाननी करण्यात येईल. हरकतदारांना स्वतः उपस्थित राहून किंवा कायदेशीर प्रतिनिधीमार्फत आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर संबंधित हरकत मंजूर करायची की फेटाळायची याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

NH 748 Land Acquisition
Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

पूरक सुविधा उभारण्यास मदत

भोम ते जुने गोवे हा मार्ग राज्यातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक मानला जातो. या मार्गावर वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर चौपदरीकरण प्रकल्पाला महत्त्व प्राप्त झाले आहे. अतिरिक्त जमीन संपादनामुळे रस्त्याची रुंदी वाढविणे, आवश्यक सेवा रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर पूरक सुविधा उभारण्यास मदत होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa nightclub fire compensation case
Sarvan Comunidade land scam
Goa Comunidade Land Grab Allegations
Bicholim Land Fraud Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com