Action Against Sand Mining in Pernem
Action Against Sand Mining in PernemDainik Gomantak

पोरस्कडे न्हयबाग येथे बेकायदा रेती काढणाऱ्या 26 होड्या जप्त

भरारी पथकाच्या संयुक्त कारवाईमुळे रेती तस्करांचं मात्र धाबं दणाणलं
Published on

पेडणे : पोरस्कडे न्हयबाग येथील तेरेखोल नदीत कॅप्टन ऑफ पोर्टने बेकायदा रेती उपसा करणाऱ्या होड्यावर धाड टाकली आहे. या धडक कारवाईत एकूण 26 होड्या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती आहे. आज 26 एप्रिल रोजी दुपारी भरारी पथकाने ही कारवाई केली असून त्यामुळे रेती तस्करांचं मात्र धाबं दणाणलं आहे.

Action Against Sand Mining in Pernem
पणजी बसस्थानकाजवळ दुचाकीचा अपघात

बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर ही कारवाई कॅप्टन ऑफ पोर्टचे उपसंचालक शिरसईकर, भरारी पथकाचे अधिकारी तथा पेडणे मामलेदार अनंत मळीक, पेडणे पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी संयुक्तरित्या केली आहे. एकाच ठिकाणी न्हयबाग पोरस्कडे येथे एकूण 26 गाड्या जप्त करण्याची ही मोठी घटना मानली जात आहे. जप्त केलेल्या होड्यांपैकी सहा होड्या पाण्यात, तर 20 होड्या वरच्या बाजूने अधिकाऱ्यांना सापडल्या आहेत. या सर्व होड्या जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या.

Action Against Sand Mining in Pernem
भररस्त्यात मालवाहू ट्रक अडकल्याने वाहतुकीचा खोळंबा

तेरेखोल नदीकिनारी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जातो असं बोललं जातं, त्याठिकाणी कोणताही रेतीचा साठा आढळून आला नाही. मात्र इतरत्र मोठ्या प्रमाणात होड्या दिसत असूनही त्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही कारवाई केवळ स्टंटबाजी असल्याचाही दावा नागरिकांनी यावेळी केला आहे.

दरम्यान या 26 होडी मालकांपैकी कुणाकडे होड्यांची कागदपत्रे, परवाने आहेत याची तपासणी केली जाईल. असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्यावेळी होड्या जप्त केल्या, त्यावेळी एकाही होडीच्या मालकाने होड्या आपल्या असल्याची कागदपत्रे सादर न केल्याने 26 होड्या पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे अधिकारी शिरसईकर यांनी सांगितलं आहे. यापुढेही अशीच धडक कारवाई सुरु राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. फावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com