फोंडा बसस्थानकाचा कायापालट होणार; सरकारकडून 1.1 कोटींचा निधी मंजूर

फोंडेकरांच्या सेवेत नवीन बसस्थानक लवकरच दाखल होणार आहे
Ponda KTC Bus Stand
Ponda KTC Bus StandDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : फोंड्यातील कदंब बसस्थानकाचा आता कायापालट होणार आहे. गोवा सरकारने बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी 1.1 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. त्यामुळे फोंडेकरांच्या सेवेत नवीन बसस्थानक लवकरच दाखल होणार आहे.

फोंडा बसस्थानकाच्या नुतनीकरणाचं काम सुरु झालं असून पुढील चार महिन्यांमध्ये ते पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2015 मध्ये सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेले 4 मीटरचे 2 बीम स्लॅबवर कोसळले होते. मात्र सरकारने याची दुरुस्ती करण्याची तसदीही घेतली नाही. त्यामुळे पडझड होत फोंडा बसस्थानक धोकादायक बनलं होतं.

Ponda KTC Bus Stand
म्हापशात कारवर कोसळला संरक्षक कठडा

फोंड्यातील बदंब बसस्थानकाचं काम 1991 मध्ये सुरु करण्यात आलं होतं. यानंतर फोंड्याचे आमदार रवी नाईक मुख्यमंत्री झाले. बसस्थानकाचं युद्धपातळीवर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 18 सप्टेंबर 1992 रोजी हे सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलं होतं. मात्र नवीन बसस्थानक झाल्यानंतर या बसस्थानकाचा उपयोग कमी झाला. प्रवाशांना घरी जाण्यासाठी जुन्या बसस्थानकावरुन नवीन बसस्थानकावर जावं लागू लागलं आणि यानंतर बसस्थानक खूपच वाईट स्थितीत होतं. आता या बसस्थानकाचा कायापालट होणार असल्याने फोंडेकरांमध्ये मात्र समाधान व्यक्त केलं जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com