Goa GST Collection: गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील राज्यातील जीएसटी संकलनात 32 टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, राज्यासाठी हा 'नवा विक्रम' आहे.
स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम, इज ऑफ डुइंग बिझनेस (EoDB) गोव्याला आर्थिक प्रगतीच्या मार्गावर पुढे नेत आहे, ज्यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होत असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
सावंत यांनी 2023-24 साठी 26,844.40 कोटी रुपयांच्या खर्चासह अर्थसंकल्प सादर करताना खाणकामासह महसूल संकलनासाठी पर्यटनावर भर दिला आहे.
याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही असे नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापन केले आहे की दोन वर्षानंतर आम्हाला कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. आमच्याकडे खाण महसूल, जीएसटी संकलन, अबकारी महसूल आणि मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 36 टक्के वाटा असेल.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचे GST संकलन वाढल्याने राज्य स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. GST संकलनात वाढ हा ‘नवा विक्रम’ बनला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.