चुकून सुटलेल्या बंदुकीच्या गोळीने घेतला मैत्रिणीचा वेध, काजूर केपेत दुर्घटना; पाळी येथील मित्राला अटक

Accidental firing in Kajoor Quepem: काजूर-केपे येथे मैत्रिणीच्या घरी पार्टी करण्यासाठी आलेल्या घाडीवाडा- सुर्ल येथील तन्वी घाडी या २२ वर्षीय युवतीच्या मानेला बंदुकीची गोळी लागल्याने ती तत्काळ गतप्राण झाली.
Accidental firing in Kajoor Quepem
Accidental firing in Kajoor QuepemDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: काजूर-केपे येथे मैत्रिणीच्या घरी पार्टी करण्यासाठी आलेल्या घाडीवाडा- सुर्ल येथील तन्वी घाडी या २२ वर्षीय युवतीच्या मानेला बंदुकीची गोळी लागल्याने ती तत्काळ गतप्राण झाली. तिचा पाळी-डिचोली येथील मित्र श्वेत गावडे हा घरात असलेल्या बंदुकीने खेळत असता, चुकून त्याच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. श्वेत आणि तन्वी यांच्या साखळी येथील एका मैत्रिणीचे काजूर-केपे येथे लग्न झाले असून तिच्याच घरी ते दोघे आले होते.

Accidental firing in Kajoor Quepem
Tourist deaths in Goa: राज्यात पर्यटकांच्या मृत्यूंनी वाढली चिंता, सव्वातीन महिन्यांत 29 प्रकरणे समोर; ड्रग्स, अपघातांसह गुन्ह्यांचे सावट

त्या मैत्रिणीच्या घरी असलेली बंदूक श्वेत हाताळत असताना चुकून त्या बंदुकीतून गोळी सुटली आणि तिथे जवळच असलेल्या तन्वीच्या मानेत घुसली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या दुर्घटनेची वर्दी केपे पोलिसांना दिल्यावर पोलिस घटनास्थळी धावून गेले.

Accidental firing in Kajoor Quepem
Goa Cyber Crime: 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा भेदला, मॅजिस्ट्रेटचे खोटे सोंग उघड; साताऱ्यात संशयित जेरबंद

त्यांनी श्वेतला ताब्यात घेतले आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू राहिल्याने त्याच्या विरोधात नेमक्या कुठल्या कलमाखाली गुन्हा नोंद केला, याची माहिती मिळू शकली नाही. तन्वी ही पाळी येथील नेस्ले कंपनीच्या पॅकिंग युनिटमध्ये कामाला होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com