Venzy Viegas
Venzy ViegasDainik Gomantak

Venzy Viegas : मुख्यमंत्र्यांचे आव्हान मी स्वीकारतो; व्हिएगस यांचे प्रतिआव्हान

‘आप’ साधणार साखळीचा विकास
Published on

उत्तर व दक्षिण गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकणार, विरोधी 7 आमदारांनी जिंकून दाखवावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेत दिलेले आव्हान आपण मुख्यमंत्र्यांच्या साखळी या मतदारसंघातच राहून स्वीकारत आहे.

साखळी बाजारात फिरून लोकांशी संवाद साधल्यानंतर समजले की मुख्यमंत्र्यांनी साखळीचा काय विकास साधला आहे ते. त्यासाठी आता साखळीला राज्याबाहेरील किंवा सिमेवरील नेत्यांची आवश्यकता नाही.

Venzy Viegas
Domestic Violence Cases in Goa: राज्यात वर्षभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या 189 घटना

यापुढे आम आदमी पक्ष साखळीला विकसित करण्याची जबाबदारी घेणार आहे, अशी प्रतिक्रिया आपचे बाणावली मतदारसंघाचे आमदार व्हेन्सी व्हिएगस यांनी व्यक्त केली.

साखळीत आज आलेल्या आमदार व्हेन्सी व्हिएगस यांनी पुढे म्हटले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेत गोव्यात एससीएसटीला आरक्षण देण्याचे आश्वासन ही एक फसवणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील आपल्या पहिल्या जाहीर सभेत गोव्याला खास दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले?

Venzy Viegas
Ponda Murder Case: दारुच्या नशेत पत्नीचा खून केला, मृतदेह मंदिराजवळ ठेवला; पण तोवर...

साखळी मतदारसंघात व पर्यायाने साखळी शहरात मुख्यमंत्र्यांनी काय विकास केला आहे याचा या बाजारात फिरून लोकांशी चर्चा केल्यानंतर प्रत्यय आला. साखळीतील किती लोकांना मुख्यमंत्र्यांनी रोजगार योजना व रोजगार दिले ते दिसून येते.

सरकार असूनही या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना साखळी विकसित करता आलेली नाही. त्यासाठी आता साखळी विकसित करण्याची जबाबदारी आम आदमी पक्ष घेत आहे, असेही आमदार व्हेन्सी व्हिएगस यांनी म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com