Goa Politics: 'गोव्यातील युवकांना नोकरी देणे हे ‘आप’चे 2025 चे लक्ष्य'! आमदार व्हेन्झींचे सरकारवर टीकास्त्र

Venzy Viegas: हे सरकार सर्व क्षेत्रात अपयशी ठरल्याचेही व्हिएगस यांनी सांगितले. ते म्हणाले, की पर्यटनाचे क्षेत्र अगदी खालावलेले आहे.
MLA Venzy Viegas
MLA Venzy ViegasDainik Gomantak
Published on
Updated on

Goa AAP Press Conference

सासष्टी: डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार मोठ मोठी आश्र्वासने देण्यात कसलीही कसर सोडत नाही. मात्र, त्याची पूर्तता करण्यास हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका बाणावलीचे ‘आप’चे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

हे सरकार सर्व क्षेत्रात अपयशी ठरल्याचेही व्हिएगस यांनी सांगितले. ते म्हणाले, की पर्यटनाचे क्षेत्र अगदी खालावलेले आहे व त्यासाठी सर्वांनीच सकारात्मक विचारसरणी अनुसरली तर या क्षेत्रात प्रगती साधण्यास वाव आहे. म्हादई, शैक्षणिक साधन सुविधा, रस्ते सुरक्षा, आरोग्य साधन सुविधा, मानवी विकास या आघाडीवर हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे, असेही व्हिएगस यांनी सांगितले.

MLA Venzy Viegas
Goa Politics: वर्ष संपलं तरी मंत्रिमंडळ बदलाला मुहूर्त नाही! प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

गोव्यातील बेकार युवकांना सरकारी किंवा खाजगी नोकरी देणे, हे ‘आप’चे २०२५ सालचे लक्ष्य असल्याचेही व्हिएगस यांनी सांगितले.

गोव्यात महागाईचा भडका उडाला आहे. तसेच गोव्यातील आयएएस अधिकारी शिष्टाचार पाळत नाहीत व आपल्या कर्तव्यांपासून दूर जात आहेत. शिवाय नोकरशाही राजकारण्यांच्या दबावाखाली कुठलेही ठोस निर्णय घेण्यास असमर्थ ठरत असल्याची टीका व्हिएगस यांनी केली. ‘आप’चे सरचिटणीस प्रशांत नायक व उपाध्यक्ष जेर्सन गोम्स यांनीही विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका केली.

MLA Venzy Viegas
Goa Politics: खरी कुजबुज: चर्चिलनाही वेध स्‍वगृही परतण्‍याचे!

२०२४ ठरले घोटाळ्यांचे वर्ष!

सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते, पाणी व गटार व्यवस्थेसाठीच्या आर्थिक तरतुदीतील ४० टक्के रक्कम वापराविना आहे. त्यामुळे २०२२ ते २०२४ या कालावधीत सर्व कामे अपूर्णावस्थेत आहेत. २०२४ साल हे गोव्यासाठी घोटाळ्यांचे वर्ष ठरले. गोव्यात जास्तीत जास्त घोटाळे झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com