

Municipal Elections: गोवा राज्याच्या राजकारणात आगामी काळ अत्यंत धामधुमीचा ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या यशानंतर, आता सर्वांचे लक्ष पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या ११ नगरपालिका निवडणुकांकडे लागले आहे. या निवडणुका म्हणजे सत्ताधारी भाजपसाठी त्यांच्या लोकप्रियतेची खरी 'लिटमस टेस्ट' मानली जातेय. राज्याच्या कानाकोपऱ्यात आतापासूनच राजकीय हालचालींना वेग आला असून, कार्यकर्ते आणि नेत्यांनी कंबर कसली आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक आणि प्रमुख शहरे राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ११ नगरपालिकांच्या विद्यमान मंडळांची मुदत एप्रिल महिन्यात संपते. त्यापूर्वीच मार्च महिन्यात पणजी शहर महानगरपालिकेची (CCP) निवडणूक पार पडणार आहे.
उत्तर गोव्यातील डिचोली, पेडणे, वाळपई आणि म्हापसा या शहरांमध्ये निवडणुकीचे वारे वाहणार असून दक्षिण गोव्यातील मडगाव, मुरगाव, सांगे, केपे, कुडचडे-काकोरा, कुंकळ्ळी आणि काणकोण या सात नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. विशेष म्हणजे, फोंडा आणि साखळी नगरपालिकांची मुदत अद्याप शिल्लक असल्याने तिथे आता निवडणुका होणार नाहीत.
फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीचे सावट या नगरपालिका निवडणुकांसोबतच राज्याचे लक्ष फोंडा विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे.दिवंगत मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग ही पोटनिवडणूक नगरपालिका निवडणुकांच्या काळातच घेण्याचे नियोजन करत असल्याने फोंडा आणि आसपासच्या परिसरातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
जनतेचा कौल आणि भविष्यातील दिशा या निवडणुकांचे निकाल केवळ शहरांच्या विकासापुरते मर्यादित नसतील, तर ते आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी मानले जातील. सरकारचा कार्यकाळ संपायला एक वर्षापेक्षा कमी काळ उरलेला असताना, या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकारविरोधी लाट आहे की सरकारबद्दल जनतेत समाधान, याचा स्पष्ट अंदाज या निकालांमधून येईल. म्हणूनच या निवडणुकांना गोव्याच्या राजकारणातील 'सेमीफायनल' म्हटले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.