Goa Politics: ‘आप’चे ‘एकला चलो’ धोरण काँग्रेस पक्षावर दबावासाठीच! शक्ती आजमावण्याचा प्रयत्न, विश्लेषकांचे मत

Goa AAP: एक दिवशीय गोवा दौऱ्यावर आलेल्या आतिशी यांनी आज बाणावली ‘आप’ कार्यालयात गाभा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
Atishi Sing, Amit Palekar
Atishi Sing, Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

Aam Aadmi Party Goa Updates

मडगाव: येत्या विधानसभा निवडणुकीत आप स्वबळावर लढणार, अशी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी सिंग यांनी जी घोषणा केली आहे ती केवळ काँग्रेस पक्षावर दबाव आणण्यासाठी आणि हा दबाव आणून गोव्यात युती झाल्यास आपल्या जागा वाढवून घेण्यासाठीच, अशा प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

‘आप’च्या गोटातून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांनुसार विधानसभा निवडणुकीचे नंतर पहाता येईल, पण जिल्हा पंचायत आणि पालिका निवडणुकीत ‘आप’तर्फे जास्तीत जास्त उमेदवार उभे करून आपली शक्ती राज्यात नेमकी काय हे जाणून घेण्यासाठी ही भूमिका घेतल्याचे सांगितले जातेय.

एक दिवशीय गोवा दौऱ्यावर आलेल्या आतिशी यांनी आज बाणावली ‘आप’ कार्यालयात गाभा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्व जागा लढविण्याचे ठरवले तर पालिका निवडणुकीतही ‘आप’चे जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला.

Atishi Sing, Amit Palekar
Goa AAP: 'आपचा काँग्रेसवर भरोसा नाही'; गोव्यात इंडिया आघाडीत फूट, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी यांची मोठी घोषणा

सध्या गोव्यात ‘आप’चे बाणावली आणि वेळ्ळी येथे दोन आमदार आहेत. सांताक्रुझमधून ‘आप’चे राज्य अध्यक्ष अमित पालेकर निवडणूक लढवू पाहात आहेत. मात्र या तिन्ही जागांवर काँग्रेसचाही दावा आहे. त्यामुळेच आता ‘आप’ने काँग्रेस विरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे मत विचारले असता, विधानसभा निवडणूक येण्यास अजून दोन वर्षे असून तोवर काहीही होऊ शकते, याकडे लक्ष वेधले. कित्येकदा दिल्लीतील नेते काही भूमिका घेतात, पण येथे गोव्यात वस्तुस्थिती वेगळीच असते. त्यामुळे नंतर निर्णय बदललेही जातात. अतिशी आमच्या पक्षाबद्दल बोललेल्या नाहीत. त्या काँग्रेसविरोधात बोलल्या, अन् हा प्रश्‍न त्या दोन पक्षांमधील आहे.

Atishi Sing, Amit Palekar
Goa Politics: आता गोव्यातही ‘आप’चे ‘एकला चलो रे’! निवडणुकांत स्वबळावर उतरणार; माजी मुख्यमंत्री आतिषी यांची घोषणा

‘हा’ तर दबावतंत्राचाच भाग!

राजकीय विश्लेषक ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो यांनी सांगितले,की अजून विधानसभा निवडणूक बरीच दूर आहे. आणि तोवर कुठल्याही पक्षाने आपले वजन वाढवण्याच्या प्रयत्न केल्यास त्यात काहीही गैर नाही. मात्र, आतिशी यांनी आज जी भूमिका जाहीर केली तो एक दबावतंत्राचा भाग असावा असे वाटते. यापूर्वीही ‘आप’ने हरियाणा येथे अशीच भूमिका घेतली होती आणि नंतर दोष काँग्रेसला दिला होता. राजकीय विश्लेषक प्रभाकर तिंबले म्हणाले, जर ‘आप’ गोव्यात विस्तार करू पाहत असेल तर त्यात गैर नाही. काहींना युतीची घोषणा आताच व्हावी, वाटते पण लगेच निर्णय म्हणजे या पक्षाची वाढ खुंटू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com