महाराष्ट्रातील तरुणाचा आगोंद समुद्रात बुडून मृत्यू

समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू
A young man from Maharashtra drowned in Agonda sea
A young man from Maharashtra drowned in Agonda seaDainik Gomantak
Published on
Updated on

भुसावळ (महाराष्ट्र) येथील विवेक मुराय (वय24) यांचा आज (ता.22) दुपारी आगोंद समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तो व त्याचा एक मित्र आज आगोंद येथे पर्यटक म्हणून आले होते. यावेळी समुद्राच्या कडेला मस्ती करताना विवेक समुद्रात गटागळ्या खाऊ लागला, किनाऱ्यावर असलेल्या दृष्टीच्या रक्षकांनी त्याला पाण्याबाहेर काढले. व उपचारासाठी त्याला काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, आरोग्य केंद्रातील (Health Center) डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काणकोण पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह मडगाव येथील हॉस्पिसियु रुग्णालयाच्या शवागृहात ठेवला आहे.

A young man from Maharashtra drowned in Agonda sea
वेर्णा पोलिसांनी तरुणाला ढोकल्या बेड्या, अंमली पदार्थ जप्त

दरम्यान, कुंकळ्ळी परिसरात एका शाळकरी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार नोंद झाल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. अज्ञाताने मुलीचं अपहरण केल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. शाळेत गेलेली मुलगी घरी परतलीच नसल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिसात दिली आहे.

कुंकळ्ळीतील एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरण झाल्याचं समोर आलं आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गोव्यातील सर्व पोलिस स्टेशनना बिनतारी संदेश पाठवला आहे. यात मुलीचं वर्णन सर्व पोलीस (Police) स्टेशन्सना कळवण्यात आलं आहे. अज्ञाताने अपहरण केल्याचंही याल नमूद करण्यात आलं आहे. गोव्यासह राज्याबाहेरील आसपासच्या सर्व पोलिस स्टेशन्सना याची माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com