Goa Crime: 'आई-बाबा माफ करा...' 22 वर्षीय पोलिसाने का घेतला टोकाचा निर्णय? कारण सांगणारा व्हिडीओ व्हायरल

Viral Video Goa: वर्षभरापूर्वीच पोलिस सेवेत भरती झालेल्या तरुणाने आत्महत्येचं पाऊल का उचललं असेल असा प्रश्न निर्माण झाला होता, आता मात्र समोर आलेल्या एका व्हिडीओमधून प्रथमेशच्या मृत्यूचं कारण समोर आलंय

Goa CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कुठ्ठाळी: वास्को रेल्वे पोलिस स्थानकात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या 22 वर्षीय प्रथमेश गावडे याने शुक्रवारी संध्याकाळी (25 ऑक्टोबर) नवीन झुआरी पुलावरुन नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.

प्रथमेश गावडे हा कुंकळ्ळीतील राहणारा असून वास्को रेल्वे पोलिस स्थानकात तो सेवा बजावत होता. वर्षभरापूर्वीच पोलिस सेवेत भरती झालेल्या तरुणाने आत्महत्येचं पाऊल का उचललं असेल असा प्रश्न निर्माण झाला होता.

आता मात्र समोर आलेल्या एका व्हिडीओमधून प्रथमेशच्या मृत्यूचं कारण समोर आलंय. या व्हिडीओमधून तो एका महिला मैत्रीसोबत झालेल्या वादामुळे मैत्रीण, महिला पोलीस हवालदार आणि तिच्या भावाने अनेक दिवसांपासून त्याचा मानसिक छळ केल्याची माहिती उघड करतोय.

Viral Video Goa: वर्षभरापूर्वीच पोलिस सेवेत भरती झालेल्या तरुणाने आत्महत्येचं पाऊल का उचललं असेल असा प्रश्न निर्माण झाला होता, आता मात्र समोर आलेल्या एका व्हिडीओमधून प्रथमेशच्या मृत्यूचं कारण समोर आलंय
Goa Crime: झुआरी पूलावरुन उडी मारुन 22 वर्षीय पोलिस शिपायाने संपवले जीवन; मृतदेहाचा शोध सुरु

झुआरी पुलावरून आत्महत्या करण्याआधी प्रथमेशने पुलावरच हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. व्हिडिओमध्ये त्याने मानसिक छळ आणि धमक्यांचा आरोप केलेल्या तीन व्यक्तींची नावे सांगितली आहेत आणि असे टोकाचे पाऊल उचलण्याच्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप व्यक्त करत पालकांची माफी मागितली आहे. हा व्हिडिओ एका मेसेजिंग ॲपवर व्हायरल झाला होता, ज्यामुळे पोलिसांना चौकशीदरम्यान एक महत्वाचा पुरावा हाती लागला आहे.

रेल्वे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी प्रथमेश हा प्रकृती ठीक नसल्याचे सांगून दोन दिवसांच्या रजेवर गेला होता.मात्र, शुक्रवारी संध्याकाळी त्याने घरी न जाता कुठ्ठाळीतील झुआरी नदीत सहाच्या सुमारास आत्महत्या केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bihar Minor Girl Harassment Viral Video
Mokhard Sisters Death Case
Goa Casino Director Shooting Case
America Double Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com