Goa Crime: झुआरी पूलावरुन उडी मारुन 22 वर्षीय पोलिस शिपायाने संपवले जीवन; मृतदेहाचा शोध सुरु

Goa Police: वास्को रेल्वे पोलिस स्थानकात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या 22 वर्षीय प्रथमेश गावडे याने शुक्रवारी संध्याकाळी (25 ऑक्टोबर) नवीन झुआरी पुलावरुन नदीत उडी मारुन आत्महत्या केली.
Goa Crime: झुआरी पूलावरुन उडी मारुन 22 वर्षीय पोलिस शिपायाने संपवले जीवन; मृतदेहाचा शोध सुरु
Zuari BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्को रेल्वे पोलिस स्थानकात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या 22 वर्षीय प्रथमेश गावडे याने शुक्रवारी संध्याकाळी (25 ऑक्टोबर) नवीन झुआरी पुलावरुन नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. आजही तटरक्षक दलाच्या मदतीने शोधकार्य सुरु असून मृतदेह आढळला नाही.

दरम्यान, प्रथमेश गावडे हा कुंकळ्ळीतील राहणारा आहे. वास्को रेल्वे पोलिस स्थानकात तो सेवा बजावत होता. वर्षभरापूर्वीच पोलिस सेवेत भरती झाला होता. रेल्वे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा प्रकृती ठीक नसल्याचे सांगून दोन दिवसांच्या रजेवर गेला होता.

Goa Crime: झुआरी पूलावरुन उडी मारुन 22 वर्षीय पोलिस शिपायाने संपवले जीवन; मृतदेहाचा शोध सुरु
Goa Crime: अखेर 13 महिन्यांच्या चिमुकलीला मिळाला न्याय; नराधमाला कोर्टाने ठोठावली 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

मात्र, संध्याकाळी घरी जाण्याचे सोडून तो कुठ्ठाळीतील झुआरी नदीवरील नवीन पुलावर आला आणि त्याने थेट पाण्यात उडी घेतली. त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. ही घटना काल संध्याकाळी सहा वाजता घडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com