Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

Goa News: आगामी पर्यटन हंगाम तसेच सणासुदीच्या तोंडावर उत्तर गोवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची (हिस्ट्रीशिटर) तपासणी करून त्‍यांच्‍यावर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
Goa News: आगामी पर्यटन हंगाम तसेच सणासुदीच्या तोंडावर उत्तर गोवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची (हिस्ट्रीशिटर) तपासणी करून त्‍यांच्‍यावर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
Akshat Kaushal Goa Police Dainik Gomantak
Published on
Updated on

Police to Conduct Nighttime Checks on History Sheeters in North Goa

पणजी: आगामी पर्यटन हंगाम तसेच सणासुदीच्या तोंडावर उत्तर गोवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची (हिस्ट्रीशिटर) तपासणी करून त्‍यांच्‍यावर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून रात्री-अपरात्री कधीही पोलिस घरी भेट देऊन चौकशी करतील, असे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.

गेल्या आठ दिवसांत १०५ जणांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. जुने गोवे, म्हापसा व वाळपई या पोलिस स्थानकांच्या हद्दीत १० हून अधिक गुन्हेगारांची चौकशी करून त्यांना ताकीद देण्यात आली आहे. या गुन्हेगारांची पार्श्‍वभूमी तपासणीची प्रक्रिया सुरूच ठेवली जाणार आहे.

कळंगुट येथ लागोपाठ घडलेल्या गुन्‍हेगारी घटनानंतर उत्तर गोव्यातील पोलिस यंत्रणा अधिक सतर्क बनली आहे.

Goa News: आगामी पर्यटन हंगाम तसेच सणासुदीच्या तोंडावर उत्तर गोवा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची (हिस्ट्रीशिटर) तपासणी करून त्‍यांच्‍यावर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
Goa Police: उत्तर गोव्यात पोलिस 'ऍक्शन मोडवर'! 122 समाजकंटकांविरोधात कारवाई

गुन्‍हेगारांचा पत्ता, मोबाईल नंबर नोंदणी

गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचा निवासी पत्ता तसेच मोबाईल क्रमांक नोंदवून घेण्यात येत आहे. तसेच ते राहत असलेल्या निवासस्थानी रात्रीच्यावेळी अचानक तपासणी करण्याच्या सूचना पोलिस स्थानक प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोके टाळता येतील, असे अक्षत कौशल यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com