Leopard In Goa: बिबटा अजूनही अडकेना; मुळगावमधील लोक भयभीत

Leopard In Goa: मुळगावमधील लोक भयभीत : वन खात्याकडून सापळा
Leopard In Goa
Leopard In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Leopard In Goa: मुळगाव भागात लोकवस्तीजवळ संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला आहे. मात्र, अजूनतरी बिबट्या काही त्यात अडकलेला नाही. एवढेच नव्हे तर सापळा लावल्यापासून बिबट्या त्याठिकाणी फिरकलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.

Leopard In Goa
Goa Tourism: गोव्याला ‘सृजनशील पर्यटन’ राजधानी बनवण्‍यास प्राधान्‍य

बिबट्या सापळ्यात अडकला नसल्याने लोकांच्या मनातील भीती मात्र कायम आहे. हा बिबट्या कधी एकदाचा सापळ्यात अडकतोय. त्याचीच लोक प्रतीक्षा करीत आहेत. सापळा लावल्यापासून वन खात्याचे कर्मचारी रोज सकाळ-संध्याकाळी सापळा लावलेल्या ठिकाणी येऊन पाहणी करतात.

दीड महिन्यापूर्वी मुळगाव भागात दहशत माजवलेल्या बिबट्याला पकडण्यात वन खात्याला यश आले असतानाच, आता आणखी एका बिबट्याचा मुळगावात संचार असल्याची माहिती समोर आली आहे.

Leopard In Goa
Vegetables In Goa: राज्यात भाज्यांचे दर समाधानकारक

नवीन बिबट्याचे दर्शन

गेल्या सोमवारी रात्रीच्यावेळी एक बिबट्या लोकवस्तीजवळ रस्त्यावर फिरताना काहीजणांना दिसला आहे. गावात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने लोक भयभीत झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी मुळगावात पकडलेला बिबट्या मादी होता. सध्या गावात संचार असलेला बिबट्या नर असावा, अशी शक्यता लोक व्यक्त करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com