Goa Tourism: गोव्याला ‘सृजनशील पर्यटन’ राजधानी बनवण्‍यास प्राधान्‍य

Goa Tourism: गोव्याला भारताची सर्जनशील राजधानी बनविण्याच्या दृष्‍टिकोनातून सरकारच्या स्टार्ट-अप आणि माहिती तंत्रज्ञान प्रोत्साहन विभागाचे (एसआयटीपीसी) प्रयत्न सुरू आहेत.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism: गोव्याला भारताची सर्जनशील राजधानी बनविण्याच्या दृष्‍टिकोनातून सरकारच्या स्टार्ट-अप आणि माहिती तंत्रज्ञान प्रोत्साहन विभागाचे (एसआयटीपीसी) प्रयत्न सुरू आहेत. त्‍यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्‍ज्ञ, मार्गदर्शकांसह प्रशासकी व्यवस्थेचे एकत्रित चर्चात्मक कार्यक्रम सुरू झाले आहेत.

Goa Tourism
Illegal Sand Extraction: बाणस्तारी रेती छाप्याबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ!

माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून यासंबंधीची महत्वपूर्ण बैठक पणजीत झाली.

या बैठकीत नव्या परिवर्तनवादी दृष्‍टिकोनाला आकार देण्यासाठी सल्लागार दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. एसआयटीपीसीने सादर केलेली उद्दिष्टे रचनात्मक समुदायामध्ये मांडण्यात आली. गोव्याला सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या केंद्रामध्ये रूपांतरित करणे या हेतूने सादरीकरण करण्‍यात आले. या सादरीकरणाने गोवा हे भारतातील अग्रणी रचनात्मक राज्य बनविण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधींवर विस्ताराने चर्चा झाली.

व्यासपीठ स्थापन करण्याचा निर्णय

या नव्या दृष्टिकोनामध्ये आर्थिक, तंत्रज्ञान, भौतिक, शैक्षणिक आणि धोरणात्मक पायाभूत सुविधांसह विविध पैलूंचा समावेश आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांतील एकत्रित प्रयत्न म्हणून यावर चर्चा झाली.

शिवाय राज्याला समर्पित रचनात्मक धोरणाची आवश्यकता असून, यावरही या बैठकीत एकमत झाले. या दृष्‍टिकोनाकडे कृतिशील वाटचाल करताना, गोव्यातील विद्यमान सर्जनशील प्रतिभांचा नकाशा तयार करून त्यांना जोडणारे व्यासपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com