Fatorda News: फातोर्डा येथे 48 लाखांच्या फसवणूक प्रकरणात न्यायालयाने एकाचा जामीन फेटाळला

आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा - न्यायालय
Court
Court Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मंगळुरू येथील मेडिकल कॉलेजमध्ये वशिला लावून तुमच्या मुलीला प्रवेश मिळवून देतो असे सांगून फातोर्डा येथील पीएदाद फेर्नांडिस यांना 48 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात बंगळुरु येथील बिनीश थॉमस याला न्यायालयाने आज अटकपूर्व जामिन नामंजूर केला. दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी हे प्रकरण हाताळले.

(A person from Fatorda was cheated of 48 lakhs on the pretext of medical college admissions)

Court
आराडी-पर्रा येथील चोरी प्रकरणी पोलीसांनी तिघांना घेतले ताब्यात

आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याने याचप्रकारे आणखी कुणाला लुटले आहे की काय याचा तपास लावण्यासाठी त्याला कोठडीत ठेवून चौकशी करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करत न्या. डिसिल्वा यांनी हा अर्ज फेटाळून लावला. आरोपीने यापूर्वी वेळोवेळी आपली अटक चुकविण्याचा प्रयत्न केला आहे ते पाहता त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास तो फरार होण्याची सरकारी वकील देवानंद कोरगावकर यानी व्यक्त केलेली भीतीही न्या. डिसिल्वा यांनी ग्राह्य मानली.

Court
वास्कोतील स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार चिखलातच; ग्राहकांनी फिरवली पाठ

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की फातोर्डा येथील फेर्नांडिस यांची मे 2016 च्या दरम्यान थॉमस याच्याशी गाठ पडली. आपण अल्पसंख्याक आयोगाशी निगडीत असून त्या जोरावर मंगळुरू येथे मिशीनरी संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये तुमच्या मुलीला एडमिशन मिळवून देतो असे सांगत त्याने त्यांच्याकडून 48 लाख उकळले.

आपल्या पत्नीचे सोने गहाण ठेवून तसेच दुसऱ्याकडून पैसे उधारीवर घेऊन फेर्नांडिस यांनी हे पैसे आरोपीला दिले होते. मात्र त्यांच्या मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये एडमिशन मिळू शकली नाही. त्यानंतर फेर्नांडिस यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला असता आरोपीने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2021 मध्ये थॉमस याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्याला शोधण्यासाठी पोलीस बंगळुरू येथे गेले असता तो दिलेल्या पत्त्यावर सापडलाच नाही.

या प्रकरणात आपल्याला अटक होणार या भीतीने आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना आपण कँसर रुग्ण असून उपचारासाठी आपल्याला वारंवार रुग्णालयात जावे लागते त्यामुळे आपल्याला अटकपूर्व जामीन देण्यात यावा अशी मागणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com