आराडी-पर्रा येथील चोरी प्रकरणी पोलीसांनी तिघांना घेतले ताब्यात

म्हापसा पोलीसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत केली अपना घरात रवानगी
Mapusa police
Mapusa police Dainik Gomantak
Published on
Updated on

बोकाची-आराडी, पर्रा येथील महिला वन्यजीव संचालकाच्या बंगल्यात चोरी केलेल्या चार संशयितांना म्हापसा पोलिसांनी गजाआड केले. यातील तिघे हे अल्पवयीन असून, त्यांची अपना घरात रवानगी करण्यात आली. मारिया फिलिपोस या तक्रारदार असून, पोलिसांनी चोरीला गेलेला 15 लाखांचा माल हस्तगत केला.

Mapusa police
वास्कोतील स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार चिखलातच; ग्राहकांनी फिरवली पाठ

या चोरीप्रकरणात, संशयित जुयल शेख (22, रा. आगरवाडा-कळंगुट, मुळ पश्चिम बंगाल) यास अटक केली असून, त्याचे इतर तिघे साथीदार हे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी अपना घरात केल्याची माहिती म्हापसा पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून दिली. या चोरीची घटना ही 17 ऑगस्टला घडली होती. रात्रीच्या वेळी हे चौघेही संशयित तक्रारदार महिलेच्या बंगल्यात घुसले व तेथील महागडे कॅमेरे, लेन्स, मोबाईल फोन, एअर पॉड व रोख रक्कम 12 हजार मिळून अंदाजित 15 लाखांचा माल चोरला.

Mapusa police
कळंगुट येथील रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणात 14 जणांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

सदर संशयित हे घरातील सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्यानुसार, तपास करीत पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळल्या. संशयितांवर यापूर्वी एकही गुन्हा नव्हता, त्यामुळे पोलिसांनी बरीच मेहनत घेत या चोरांना पकडले. पोलिसांनी संशयितांकडून चोरीचा ऐवज ज्यात दोन कॅमेरे, पाच लेन्स, एक एअरपॉड, दोन कॅमेरे मिळून 15 लाखांचा माल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.

निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विराज कोरगांवकर, बाबलो परब, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल राजेश कांदोळकर, प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, लक्ष्मीकांत नाईक या पथकाने संशयित चोरांचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. या पथकास उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई व उपअधीक्षक जिवबा दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.

संशयित जुयल शेख हा सुरक्षा रक्षकाची नोकरी करायचा. त्यानेच आपल्या इतर या अल्पवयीन मित्रांसोबत ही घरफोडी केल्याचे पोलिसांनी सांगितले. मुळात या संशयितांना हा चोरीचा ऐवज इतक्या किंमतीचा असेल, याची कल्पना नव्हती. याप्रकरणी, पोलिसांनी संशयिताविरुद्ध 457, 380 कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com