Mapusa Police: जुगार खेळणाऱ्या 9 जणांना अटक; म्हापसा पोलिसांचा 2 ठिकाणी छापा

12 हजाराचा मुद्देमाल जप्त
Mapusa police raid
Mapusa police raid Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Police: म्हापसा पोलिसांनी जुगाराविरोधात कठोर कारवाईला सुरवात केली आहे. म्हापसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकून म्हापसा पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे. एकूण 12,900 रूपयांचा मु्ददेमाल जप्त करण्यात आला आहे.

Mapusa police raid
Goa Government: गोवा सरकार केंद्राला लिहिणार पत्र; ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के कराच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी

म्हापशाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी याबाबत माहिती दिली. म्हापसा पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांना छापा टाकून पकडले होते.

वेगवेगळ्या छाप्यांमध्ये अर्जुन चंद्रकांत गावडे (वय 38, रा. शेट्येवाडो, म्हापसा) विजयकुमार मणिचंद (रा. दांडो, शिओली), रमेश गणेश बुधाथोकी (वय 21, रा. करसवाडा, म्हापसा), रोहित रवी रॉय (वय 28, रा. सेरेनिटी अपार्टमेंट, धुळेर म्हापसा), विजय सुरेश साळुंके (वय 35, रा. थिवी, बार्देश) यांना ताब्यात घेतले गेले. त्यांच्याकडून रोख रुपये 5900 जप्त केले.

Mapusa police raid
Mapusa Police: अल्पवयीन मुलीचे म्हापशातून अपहरण? मित्रही दोन दिवसापासून गायब; पोलिस तपासात समोर आले वेगळेच सत्य...

स्विस चॅपल येथील पुष्पराज पावसकर यांच्या मालकीच्या जाग्यात छापा टाकण्यात आला होता. त्यात यश किशोर नाईक (वय 27, गणेश मंदिराजवळ, खोर्ली) रवी कलाप्पा लमाणी (वय 34), प्रकाश परसप्पा लमाणी (वय 30), अनिल केरकर (खोर्ली), पांडुरंग शंकर तेली (वय 39, रा. शेट्येवाडो, म्हापसा) यांना ताब्यात घेतले गेले होते. त्यांच्याकडून 7000 रूपये जप्त केले होते.

सर्व मिळून नऊ जणांवर गोवा दमण आणि दीव सार्वजनिक जुगार कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शितकांत नायक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com