Goa Congress: ऑपरेशन लोटसनंतर जयराम रमेश यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणून...

Goa Congress: गोव्यात आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
Jairam Ramesh
Jairam RameshDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress: गोव्यात आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसचे काही आमदार भाजपवासी होणार, अशी चर्चा गोव्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. आज अखेर या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांच्यासह सात आमदारांनी विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर काँग्रेस नेत्यांनी एकीकडे भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला सुरु केला, तर दुसरीकडे, त्यांना तपास यंत्रणेचा लोभ किंवा भीती दाखवली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजपवर (BJP) टीका करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, 'भारत जोडो' यात्रेच्या यशामुळे मोदी सरकारसह गोवा (Goa) सरकार घाबरले आहे.'

Jairam Ramesh
Goa Congress Rebel : काँग्रेस आमदारांचा गट विलीनीकरणासाठी सज्ज; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, "भाजप सध्या अस्वस्थ आहे. भारत जोडो यात्रेला कमकुवत करण्यासाठी सातत्याने भाजप कॉंग्रेसवर टिका करत आहेत. परंतु आम्ही आमच्या मतांवर ठाम आहोत. भाजपच्या घाणेरड्या प्रचाराला आम्ही बळी पडणार नाही."

दुसरीकडे, राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह सहा आमदारांचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. या 8 आमदारांमध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अलेक्सियो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश आहे.

Jairam Ramesh
Goa Congress MLA| अखेर नजिर खान यांचे ते भाकीत खरे ठरले! काँग्रेसच्या आठ आमदार भाजपच्या वाटेवर

काँग्रेस सोडण्याचा प्रवास सुरु झाला - प्रमोद सावंत

यावेळी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल करताना म्हटले की, 'काँग्रेसची 'छोडो यात्रा' सुरु झाली आहे.' फेब्रुवारी महिन्यात गोवा काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करत म्हटले होते की, "गोवा फॉरवर्ड पार्टी अलायन्सचे सर्व 40 उमेदवार एकजूट आणि निष्ठावान राहण्यासाठी #PledgeOfLoyalty घेतील. आम्ही गोव्याची खरी ओळख पुसणाऱ्या गटात कधीही सामील होणार नाही. त्याचबरोबर कधीही समर्थन करणार नाही किंवा सहभागी होणार नाही याची शपथ घेतो.'' मात्र आता, काँग्रेसचे 8 आमदार काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com