laid Foundation stone for the renovation of Samadhi Bhausaheb Bandodkar
laid Foundation stone for the renovation of Samadhi Bhausaheb BandodkarDainik Gomantak

Bhausaheb Bandodkar : तीन महिन्यांत भाऊसाहेब बांदोडकर स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 50 व्या पुण्यतिथीनि​मित्त मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले
Published on

50th Punyatithi of Dayanand Bhausaheb Bandodkar : गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि उद्योगपती भाऊसाहेब बांदोडकर यांचे गोव्यासाठी योगदान मोठे आहे. त्यांनी दहा वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले. तसेच या काळात त्यांनी गोव्यामध्ये अनके सुधारणा केल्या. भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती आज राज्यभरात साजरी करण्यात येत आहे.

मिरामार येथील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीस्थळी शनिवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांच्या 50 व्या पुण्यतिथीनि​मित्त अभिवादन केले. मगोचे नेते व विजमंत्री सुदिन ढवळीकर व भाऊसाहेबांचे कुटुंबिय स्मृतीस्थळी उपस्थित होते. 

"येत्या तीन महिन्यांत गोवा फुटबॉल असोसिएशनतर्फे भाऊसाहेब बांदोडकर स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल" अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

laid Foundation stone for the renovation of Samadhi Bhausaheb Bandodkar
'मित्राचा तो कॉल खोटा असावा अशी मी प्रार्थना करत होतो', बाणस्तारी अपघातात आई - बाबांना गमावलेल्या साहिलने सांगितला थरारक अनुभव

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 50 व्या पुण्यतिथीनि​मित्त सरकारने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. भाऊसाहेब हे फूटबॉल प्रेमी होते. गोव्यातील युवा फूटबॉलपटूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी भाऊसाहेब बांदोडकर स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन येत्या तीन ते चार महिन्यांत करण्यात येणार आहे.

येत्या वर्षभरात दूरअवस्थेत असलेल्या असलेल्या सर्वच सरकारी शाळांच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले जाईल. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीस्थळाचेही नूतनीकरण करणात येणार आहे. गोव्याचा विकासाची माहिती राज्यातील शालेय मुलांपर्यत पोहचवण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com