Emergency: आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण; भाजप गोव्यात साजरा करणार ‘काळा दिवस’

स्वातंत्र्यानंतर अवघ्या 28 वर्षांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्णयामुळे देशाला आणीबाणीच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या.
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

स्वातंत्र्यानंतर अवघ्या 28 वर्षांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निर्णयामुळे देशाला आणीबाणीच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. 25-26 जूनच्या रात्री आणीबाणीच्या आदेशावर राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या स्वाक्षरीने देशात आणीबाणी लागू झाली होती. भारताच्या इतिहासातील हा ‘काळा दिवस’ मानला जातो. इंदिरा गांधी यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 352 अन्वये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती, जी देशातील पहिली राष्ट्रीय आणीबाणी होती.

दरम्यान, 25 जून 1975 रोजी देशात काँग्रेसने आणिबाणी लागू केली होती, त्यामुळे हा दिवस भाजप 'काळा दिवस' म्हणून राज्यभर साजरा करणार आहे. यावर्षी या घटनेला 50 वर्षे पूर्ण होणार असून युवा पिढीला इतिहासाची ओळख करुन देण्यासाठीच कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती भाजप सरचिटणीस दामोदर नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Goa BJP
BJP To Introspect South Goa Defeat: दक्षिणेत पल्लवी धेंपेंचा पराभव का झाला? भाजप कारणांचा शोध घेणार

त्यामुळे इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लागू केली

1971 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींनी युनायटेड सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार राजनारायण यांचा पराभव केला होता. मात्र या पराभवानंतर राजनायारण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात इंदिरा गांधींवर सरकारी यंत्रणा आणि संसाधनांचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत खटला दाखल केला होता. यासंदर्भात 12 जून 1975 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींना दोषी ठरवत त्यांची निवडणूक बेकायदेशीर ठरवली होती. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना 6 वर्षे कोणतीही निवडणूक लढवण्यास मनाई केली होती. त्यामुळे इंदिरा गांधींना पंतप्रधानपद सोडणे अनिवार्य झाले होते.

Goa BJP
Goa BJP: सावर्डेचे माजी आमदार दीपक पाऊस्कर यांचा भाऊ संदीप यांच्यासह भाजपात प्रवेश

भारतात तीन वेळा आणीबाणी लागू करण्यात आली

भारतात एकदा नव्हे तर तीनदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये चीनसोबतच्या युद्धात पहिल्यांदाच आणीबाणी लागू केली होती. दुसरी आणीबाणी इंदिरा गांधींनी 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान लागू केली होती. वरील दोन्ही आणीबाणी बाहेरील देशांच्या आक्रमकतेमुळे लादण्यात आल्या होत्या. पण तिसरी आणीबाणी 1975 मध्ये देशातील अंतर्गत अशांततेचे कारण देत इंदिरा गांधींनी लादली, त्याला कडाडून विरोध झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com