Goa BJP: सावर्डेचे माजी आमदार दीपक पाऊस्कर यांचा भाऊ संदीप यांच्यासह भाजपात प्रवेश

Goa BJP: पल्लवी धेंपे यांच्या रूपाने पक्षाने एक चांगला उमेदवार मिळाला असून त्यांना जिंकून आणण्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले.
Goa BJP
Goa BJP
Published on
Updated on

Goa BJP

दक्षिण गोव्यातून यावेळी भाजपकडे विजयश्री खेचून आणण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंबर कसली आहे. पक्षापासून दूर गेलेले कार्यकर्ते आणि माजी पदाधिकाऱ्यांना पक्षात परत आणण्याची मोहीम सध्या भाजपने सुरू केली आहे.

आज सावर्डेचे माजी आमदार दीपक प्रभू पाऊस्कर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

दीपक पाऊसकर हे चांगले व्यक्ती असून त्यांनी स्वार्थासाठी काहीच केले नाही. लोकांच्या कल्याणासाठी ते कार्यरत असतात. काही कारणामुळे ते आमच्यापासून दूर गेले; पण आता त्यांनी भाजपला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचे सांगून पक्षात प्रवेश केला असून त्यांचे आम्ही स्वागत करतो, असे डॉ. सावंत म्हणाले.

भाजप तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबत माझे चांगले संबंध चांगले असून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यासाठी भाजपला पूर्ण पाठिंबा देत आहे. आमदार गणेश गावकर आणि आपण मिळून सुमारे 15 हजार मतांची आघाडी भाजपला मिळवून देणार असल्याचे पाऊस्कर यांनी सांगितले.

पल्लवी धेंपे यांच्या रूपाने पक्षाने एक चांगला उमेदवार मिळाला असून त्यांना जिंकून आणण्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले.

Goa BJP
ST समाजाच्या नेत्यांना गोव्याचा CM होण्याची संधी मिळायला हवी; आरक्षणाचा प्रश्न निकालात काढणार - काँग्रेस

सावर्डे मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून पक्षाला दरवेळी या 66 मतदारसंघातील लोकांनी मोठी आघाडी मिळवून दिली आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांची आम्हाला गरज असून मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी यावेळीही सावर्डे मतदारसंघातील जनता आमच्या पाठीशी उभी राहणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

डंप धोरणामुळे 10 वर्षे काम

सावर्डे मतदारसंघ हा खाणीवर अवलंबून आहे हे आम्हाला ठाऊक असून खाणी सुरू करण्यास आमचे प्रयत्न सुरूच आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीची बंधने असल्याने खाणी सुरू करता आल्या नाहीत; पण येत्या दोन वर्षांत पूर्वीप्रमाणेच हा व्यवसाय सुरु होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

डंप धोरण सुरू होताच खाण वाहतूक सुरू होणार असून राज्यातील डंप सुरू झाल्यास लोकांना दहा वर्षे काम मिळणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com