गोव्यातील सराफी दुकानातून पाच किलो चांदी लंपास

म्हापशातील घटना : भिंतीला भोक पाडून दुकानात प्रवेश केला.
गोव्यातील सराफी दुकानातील पाच किलो चांदी लंपास
गोव्यातील सराफी दुकानातील पाच किलो चांदी लंपासDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापसा (Mapusa) कदंब (Kadamba) बसस्थानकासमोरील ब्रागांझा बिल्डिंगमध्ये मोठी चोरी झाली. सिद्धार्थ सांगोडकर यांच्‍या मालकीच्या ‘श्री ज्वसेलर्स’ या सराफी दुकानाच्या मागच्‍या भिंतीला रात्रीच्या वेळी मोठे भोक पाडून चोरट्यांनी दुकानातील सुमारे तीन लाख किमतीच्या पाच किलो चांदीची चोरी केली आहे. म्हापसा येथील ‘श्री ज्वेलर्स’ या आस्थापनाच्या भिंतीला भोक पाडून चोरी केल्यानंतर त्याबाबत पाहणी पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई व म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी केली. (5 kg silver stolen from goldsmith's shop in Goa)

गोव्यातील सराफी दुकानातील पाच किलो चांदी लंपास
Goa: 'देवस्थाने' ही सामाजिक उपक्रमांची केंद्रे बनवावी

त्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा रात्रीच्या वेळी दुकानमालक बंद करून ठेवीत असतो. त्यामुळे पोलिस तपासाच्या दृष्टीने त्या कॅमेराचा उपयोग होणे शक्यच नाही. तसेच, गांधी चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी लावलेले पालिकेचे कॅमेरे नादुरुस्त असल्याने या प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना अडचणीचे तथा त्रासदायक ठरणार आहे. या चोरीची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक राहूल परब, उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याबाबत पाहणी केली. उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी या घटनेचा पंचनामा केला.

गोव्यातील सराफी दुकानातील पाच किलो चांदी लंपास
Goa Rape Case: आसामी युवतीवर बलात्कार प्रकरणी 21 ऑगस्टला सुनावणी

ब्रागांझा इमारतीचे दुरुस्तीकाम करणाऱ्या कामगारांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आजूबाजूच्या दुकानांतील कॅमेरांमध्ये काही धागेदोरे सापडत आहेत का, याबाबतचा तपासही पोलिस करीत आहेत.

कॅमेराची दिशा बदलून चोरट्यांनी साधला डाव!

काल मंगळवारी 10 रोजी रात्री 12.15च्या सुमारास त्या चोरट्यांनी ब्रागांझा बिल्डिंगमधील सीसीटीव्ही कॅमेराची दिशा बदलून दुकानाच्या मागच्या भिंतीला भोक पाडून दुकानात प्रवेश मिळवला. त्या दुकानात रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने नव्हते. त्यामुळे केवळ पाच किलो वजनाची चांदी चोरट्यांच्या हाती लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com