आपल्या सभोवतालच्या परिसरात सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी बदलत्या काळानुसार देवस्थान (Temple) समित्यांनी फक्त अध्यात्मिक कार्यक्रमावर (Spiritual Program) अवलंबून न राहता, देवस्थानाच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर दिला पाहिजे, जेणेकरून देवस्थानाचा नावलौकिक वाढण्यास मदत होऊन त्याचा लाभ समाजातील विविध घटकांना मिळण्यास फार मदत होते, असे प्रतिपादन माजी पंचायत (Former Panchayat Minister) मंत्री व्यंकटेश उर्फ बंडू देसाई यांनी होंडा आजोबा देवस्थानात (Aajoba Devsthan, Honda) सुरू झालेल्या श्रावण मास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर सांखळी मतदार संघाचे माजी आमदार (Sanqlim Former MLA) प्रताप गावस, होंडा जिल्हा पंचायत सदस्य (Honda ZP Member) सगुण वाडकर, होंडा पंचायतीचे सरपंच आत्मा गावकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रशांत देसाई, पंच सुरेश माडकर, शिवदास माडकर, माजी सरपंच उल्हास गावडे, कुडणे देवस्थान समितीचे अध्यक्ष सिध्दार्थ मळीक, सांखळी नगरपालिकेच्या नगरसेविका कुंदा माडकर, सत्तरी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत, उत्सव समिती अध्यक्ष विठोबा वांतेकर, महीला समिती अध्यक्ष सुफला देसाई, देवस्थानचे माजी अध्यक्ष प्रकाश गावस आदी मान्यवर उपस्थित होते. (Goa)
यावेळी माजी मंत्री व्यंकटेश देसाई यांनी आजोबा देवस्थान तर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमांची प्रशंसा करून, या देवस्थानाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून, सर्व भक्तांना यांचा लाभ मिळवून द्यावा, त्यामुळे देवस्थानाचा महीमा दुर वर जाण्यास मदत होणार. या देवस्थानाच्या वतीने सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन जात असल्याचे कार्य अभिनंदनिय आहे, अशाच प्रकारे पुढची वाटचाल सुरू ठेवावी असे शेवटी सांगितले. यावेळी माजी आमदार प्रताप गावस यांनी देवस्थान कार्याचे कौतुक करताना सांगितले की, सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी देव भक्ती व दान धर्म हा खरा उपाय आहे, त्यामुळे नागरिकांनी देव भक्तीला सुद्धा वेळ व शक्य असल्यास काही प्रमाणात दान धर्म केल्यास मानसिक सुख प्राप्त होऊन सर्व प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी कवच कुंडल प्राप्त होण्यासाठी मदत होईल असे शेवटी सांगितले.
या प्रसंगी होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, पंच सुरेश माडकर, शिवदास माडकर, प्रकाश गावस, सुफला देसाई, विठोबा वांतेकर, उदय सावंत यांची देवस्थान कार्याची स्तुती करण्या संबंधिची भाषणे झाली. यावेळी होंडा औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या चौधरी कंपनीच्या वतीने देवस्थानाला विजेच्या रोषणाई संबंधी व्यवस्था उपलब्ध करून दिल्या बद्दल त्यांचा माजी मंत्री व्यंकटेश देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी स्वागत करुन देवस्थान समितीच्या वतीने नियोजित केलेल्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता राघोबा परब हीने केले तर देवस्थान समितीचे सचिव अनंत धुमे यांनी आभार व्यक्त केले. त्यानंतर स्थानिक महीला भजन मंडळाचे भजन सादर करून श्रावण मास कार्यक्रमास सुरुवात झाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.