Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

Yuri Alemao: चांदोर येथील 'ते दोन्ही मार्ग' चालू ठेवा- आलेमाव

रेल्वे लेव्हल क्रॉसिंग 1 मे पासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे.
Published on

Yuri Alemao चांदोर येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग 1 मे पासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. परिणामी हा मार्ग बंद झाल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे.

याबाबत विरोधी पक्षाचे नेते युरी यांनीं बोलताना असे सांगितले आहे कि, रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे शाळकरी मुले, चर्चला जाणारे भाविक, बाजाररहाट करणारे यांची गैरसोय होणार आहे.

त्यामुळे येथील अंडरपास आणि लेव्हल क्रॉसिंग दोन्ही चालू ठेवावेत अशी मागणी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com