Goa Crime: मानवी तस्‍करी; सहा वर्षांत 283 तरुणींची सुटका

Goa Crime: आंतरराष्‍ट्रीय टोळ्‍यांचा सहभाग : चांगल्‍या नोकरीचे आमिष हेच कारण
NCRB Data Of Goa
NCRB Data Of Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

सुशांत कुंकळयेकर

Goa Crime: जागतिक पर्यटन स्‍थळ असलेल्‍या गोव्‍यात मानवी तस्‍करीची प्रकरणे वाढू लागली आहेत. गेल्‍या सहा वर्षांत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आलेली असून या कालावधीत तब्‍बल 283 युवतींची सुटका करण्‍यात आली आहे. हे प्रमाण पाहिल्‍यास सरासरी दरवर्षी गोव्‍यात 45 ते 50 तरुणींची सुटका केली जाते.

NCRB Data Of Goa
Goa Politics: लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतील विजयाचा विश्वास; 60 हजारांचे मताधिक्य नक्की

मात्र, या व्‍यवसायाची एकूण व्‍याप्‍ती पाहिल्‍यास हे प्रमाण दहा टक्‍केही नसल्‍याचे सांगितले जाते. गोव्‍यातील या मानवी तस्‍करीत आंतरराष्‍ट्रीय टोळ्‍यांचाही सहभाग असल्‍याचे दिसून आले असून भारतात चांगली नाेकरी मिळवून देतो असे आमिष दाखवून या युवतींना गोव्‍यात आणून त्‍यांना शरीरविक्रयाच्‍या व्‍यवसायात जुंपल्‍याचे दिसून आले आहे.

राज्यात गेल्या सहा वर्षांत मानवी तस्करीसाठी आणलेल्या २८३ जणांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील २७१ महिला, तर १२ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. केंद्रीय गृह खात्‍याकडून ही माहिती प्राप्‍त झाली आहे.

NCRB Data Of Goa
Manohar Parrikar: असंतोषाला समाजमाध्यमांद्वारे मोकळी वाट; पर्रीकरांवरील टीकेचे पडसाद

गोव्यात २०१८ मध्ये ९३ महिला व ९ अल्पवयीनांची सुटका करण्यात आली होती. २०१९ मध्ये ८८ महिला व २ अल्पवयीन, २०२० मध्ये ८८ महिला व २ अल्पवयीन, २०२१ मध्ये ३५ महिला, २०२२ मध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली, तर मागच्‍या २०२३ साली २५ महिलांची पोलिसांनी सुटका केली. त्‍यातील १९ महिला या केनिया आणि नेपाळ या देशातील होत्‍या.

तीन वर्षांत ३३ गुन्हे!

एनसीआरबीच्या वार्षिक अहवालानुसार राज्यात तीन वर्षांत मानवी तस्करी विरोधात ३३ गुन्हे दाखल करण्यात आले. या ३३ पैकी २०२० मध्ये १७, २०२१ मध्ये १५, तर २०२२ मध्ये एक गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्यांचे प्रमाण ०.१ टक्के, तर आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण ३३ टक्के होते. २०२२ मध्ये एका भारतीय महिलेला वेश्या व्यवसाय करण्याच्या हेतूने तस्करी करण्याचा प्रयत्न झाला होता. यावर्षी न्यायालयाने एकूण १४ खटल्यांचा निकाल लावला, तर १५ खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली.

आंतरराष्‍ट्रीय रॅकेट उघड

सप्टेंबर २०२३ मध्ये बंगळुरू पाेलिसांनी शरीरविक्रयाच्‍या व्‍यवसायात असलेल्‍या काही केनियन युवतींना अटक केल्‍यानंतर या युवतींना गाेव्‍यातून बंगळुरूला पाठविण्‍यात आले. त्‍या अनुषंगाने तपास केला असता गोव्‍यात एक आंतरराष्‍ट्रीय रॅकेट कार्यरत असल्‍याचे उघडकीस आले. चांगली नोकरी देण्‍याच्‍या आमिषाने या युवतींना गोव्‍यात आणले होते. ८ सप्‍टेंबर रोजी कळंगुट येथे एका घरावर छापा टाकून पाच केनियन युवतींची सुटका केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com