Manohar Parrikar: असंतोषाला समाजमाध्यमांद्वारे मोकळी वाट; पर्रीकरांवरील टीकेचे पडसाद

Manohar Parrikar: नेत्यांची गुपचिळी; समर्थकांची घुसमट
Manohar Parrikar
Manohar ParrikarDainik Gomantak
Published on
Updated on

Manohar Parrikar: भाजपचे मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी माजी मुख्यमंत्री तथा पद्मभूषण मनोहर पर्रीकर यांच्यावर केलेल्या टीकेवर त्यांचे समर्थक सध्या समाजमाध्यमांतून मनातील खदखद व्यक्त करीत आहेत. उघडपणे बोलणे पक्षाच्या नेत्यांना पटेलच असे नाही. त्यामुळे त्यांनी व्यक्त होण्यासाठी समाजमाध्यमांचा आसरा घेतलेला दिसतो.

Manohar Parrikar
Turmeric Farm In Goa: गोव्यात हळदीचे पीक फायद्याचे की तोट्याचे?

रूपेश कामत म्हणतात, पणजी आणि गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या काळात झालेला विकास ज्याने पाहिला नाही, त्याला अज्ञानी समजावे लागेल. समाजाचा विकास आणि कल्याणावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी मनोहरभाई नेहमीच एक प्रतीक, प्रेरणा आणि गुरू राहतील.

कामत यांच्या या वक्तव्यातून पर्रीकरांचे मोठेपण आणि त्यांच्या कार्याची उंची दाखविण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. त्यांनी शनिवारी आपले मत समाजमाध्यमांवर व्यक्त केले. त्यावर 42 जणांच्या प्रतिक्रिया आल्या, त्यातून अनेकांनी आपल्या मनातील खदखद आणि मनोहर पर्रीकर यांच्याविषयी प्रेम व्यक्त केलेले दिसते.

समाजमाध्यमांवर उमटलेल्या प्रतिक्रिया

गिरीराज पै वेर्णेकर : मला आशा आहे की बाबूशला भाईंच्या समाधीस्थळी जाण्यापासून रोखले जाईल. तेथे नाटक कशासाठी करतात तर?

संदेश तिंबलो : तुमचे विधान आवडले. पक्ष अजूनही गप्प आहे का हे समजले नाही. राज्यातील आणि सध्याच्या राजवटीतील भाजप कार्यकर्त्यांनी भाईंवर झालेल्या वैयक्तिक टीकेनंतर एकही शब्द उच्चारलेला नाही. ते भाई आणि पक्षाची नैतिकता विसरलेले नाहीत.

मुकेश पै आंगले : भाजपच्या उच्चपदस्थांनी बाबूश यांना ताबडतोब बडतर्फ करावे. त्यांना त्यांची पातळी दाखवावी. जोपर्यंत त्यांना बडतर्फ केले जात नाही, तोपर्यंत मनोहरभाईंच्या निकटवर्तीयांचा आणि कार्यकर्त्यांचा त्यांना उघडपणे विरोध राहणार.

अमिन खान : मनोहर पर्रीकर हे ‘मॅन ऑफ दी मिशन’ होते. म्हणून सर्व अल्पसंख्याक मनोहर पर्रीकर यांना सलाम करतात. त्यांनी मुस्लिमांसाठी चांगली कामे केली होती.

Manohar Parrikar
Minister Babush Monserrate: अतिक्रमणाची प्रकरणे वर्षभरात निकाली काढू

अमोल साळवी : रूपेश, तुमच्या धाडसाचे आणि तुमच्या वर्तुळातील इतर काही लोकांचे कौतुक आहे, जे पहिल्यांदाच पक्षातील या गंभीर शिस्तीच्या चिंतेबद्दल उघडपणे समोर आले आहेत. मला विश्वास आहे आणि अजूनही आम्ही ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहोत. मी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि भाजप झालेल्या टीकेबद्दल कारवाई करेल. पक्षाची विचारधारा वळवली जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी हा मुद्दा पुढे येईल.

तुमच्या माहितीसाठी सर्व पणजीकर आणि गोवावासी भाईंसोबत आहेत. आश्चर्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमध्येही दहशतीसारखी स्थिती आहे हे विचित्र; पण खरे आहे. अलीकडच्या काळात विविध अभूतपूर्व राजकीय उलाढालींमुळे गमावलेल्या भाजपच्या खऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची ही एक संधी आहे. बारीक माणसाला राजीनामा देण्याची गरज आहे.

विष्णू नाईक : बाबूश यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. मनोहरभाईंच्या निधनानंतर अपमान करणाऱ्या व्यक्तीला मनोहरभाईंच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या सरकारातील फळे चाखण्याचा अधिकार नाही.

नीरज कामत : मनोहर पर्रीकरांसमोर बाबूस मोन्सेरात ‘किस पेड की पत्ती?’

विवेक डांगी : रूपेश तू दणका दिलास.. पणजीतील लोक या विधानावर किती ठाम आहेत? ते आमदारांशी सहमत आहेत की पर्रीकरांना इतक्या लवकर विसरतात?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com