Goa Politics: लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतील विजयाचा विश्वास; 60 हजारांचे मताधिक्य नक्की

Goa Politics: मुख्यमंत्री: लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतील विजयाचा विश्वास
Lok Sabha
Lok SabhaDainik Gomantak

Goa Politics: भाजप सरकार देशात साधनसुविधा व मानवतेचा विकास साधण्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. तसेच नारीशक्ती, युवाशक्ती, किसानशक्ती व गरीब कल्याण योजनेद्वारे प्रत्येकाचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पुढाकार घेत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Lok Sabha
Manohar Parrikar: असंतोषाला समाजमाध्यमांद्वारे मोकळी वाट; पर्रीकरांवरील टीकेचे पडसाद

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून भाजपचा उमेदवार 60 हजार मतांनी विजयी होणार आहे, असेही ते म्हणाले. बायणा समुद्रकिनारी बीट पोलिस चौकीचे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, साळगावचे आमदार केदार नाईक, राज्य भाजप सरचिटणीस दामू नाईक, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर,

मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, गोवा आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा मुरगाव भाजप गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, राज्य मानव संसाधन विकास मंडळाचे उपाध्यक्ष दीपक नाईक, संतोष केरकर, रवींद्र भवन बायणाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, नगरसेविका कृणाली पार्सेकर, अविनाश नाईक व इतर उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, देशात पाचशे वर्षांनी श्रीराम मंदिर होत असून हा दिवस प्रत्येक देशवासीयासाठी आनंदाचा आहे. देशात मोदी, तर राज्यात डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार विकासकामांत अग्रेसर आहे.

भाजप लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकणार

लोकसभा निवडणुकीत भाजप गोव्यातील दोन्ही जागांवर विजय संपादन करून दाखविणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. तसेच दक्षिण गोव्यातील लोकसभेच्या निवडणुकीत येथील भाजपचा उमेदवार 60 हजार मतांनी विजयी होणार आहे. यंदा दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप शंभर टक्के यश संपादित करणार आहे. यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन आरोग्य केंद्रास मान्यता

आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले की, मुरगावातून भाजपने १० हजार सदस्य नोंदणी करून राज्य भाजप सरकारचे हात मजबूत केले आहेत. येणाऱ्या काळात मुरगावात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सरकारकडून मान्यता प्राप्त झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com