जेल फोडून सुरक्षा रक्षकांना डांबले आत; 15 वर्षांनी गोवा पोलिसांना कसा सापडला खून प्रकरणातील फरार आरोपी
Goa Police Crime NewsDainik Goamantak

जेल फोडून सुरक्षा रक्षकांना डांबले आत; 15 वर्षांनी गोवा पोलिसांना कसा सापडला खून प्रकरणातील फरार आरोपी

Goa Jail: २००७ साली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, पणजीने दोघांना गोडवीन डिसिल्वा खून प्रकरणात दोषी ठरवले.
Published on

पणजी: खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी मडगावातील न्यायालयीन कोठडी फोडून पलायन केले. पणजीतील व्यक्तीचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणात २००७ साली न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. कोठडीतून पलायन केल्यानंतर नाव आणि जन्मतारीख बदलून तब्बल १५ वर्षे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. पश्चिम बंगालमधील हॉटेलमध्ये काम करत असताना पोलिसांनी त्याला डिसेंबर २०२२ मध्ये पुन्हा अटक केली.

गोडवीन डिसिल्वा (रा. कंरझाळे) या व्यक्तीचा २३ एप्रिल २००५ साली चाकूने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी पणजी पोलिसांनी कलम ४४९, ३०२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंद करुन, जॅक्सन दाडेल आणि रुडॉल्फ गोम्स या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. दोघांची मडगावातील न्यायालयीन कोठडी रवानगी केली . २००७ साली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, पणजीने दोघांना डिसिल्वा खून प्रकरणात दोषी ठरवले.

जेल फोडून सुरक्षा रक्षकांना डांबले आत; 15 वर्षांनी गोवा पोलिसांना कसा सापडला खून प्रकरणातील फरार आरोपी
Cyber Crime: अक्षर साक्षरतेमध्ये आघाडीवर असणारा गोवा, आर्थिक साक्षरतेमध्ये पिछाडीवर का?

न्यायालयाने निकाल दिल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपी डिसिल्वा आणि गोम्स या दोघांसह १२ जणांनी कोठडी फोडून पलायन केले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी कोठडीच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करुन त्यांना कोठडीत डांबून सर्वजण फरार झाले.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोठडीचे सुरक्षा रक्षक प्रसाद वाटप करत असताना आरोपींनी संधी साधून रक्षकांना पकडून मारहाण केली. या घटनेची दखल घेऊन मडगाव पोलिसांनी कलम 224, 323, आणि 342 अंतर्गत दुसरा गुन्हा नोंद केला. तेव्हापासून पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरु केला. जॅक्सन दाडेल पश्चिम बंगालमध्ये असल्याचे टीप गोवा पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी तात्काळ पश्चिम बंगाल गाठले असता दाडेल कोलकातापासून २०० किलोमीटर लांब असलेल्या दिघा येथील गावात असल्याची माहिती मिळाली. येथून आरोपी दाडेलला पोलिसांनी डिसेंबर २०२२ मध्ये पुन्हा अटक केली.

जेल फोडून सुरक्षा रक्षकांना डांबले आत; 15 वर्षांनी गोवा पोलिसांना कसा सापडला खून प्रकरणातील फरार आरोपी
Goa Politics: खरी कुजबुज: भाजपला पर्याय हवा; पण काँग्रेस गंभीर आहे का?

जॅक्सन दाडेल गेल्या १५ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. फरार झाल्यानंतर दाडेलने नाव बदलून 'राजीव कश्यप' असे केले होते. तसेच ज्यादिवशी फरार झाला म्हणजेच १६ ही तारीख त्यांने जन्मतारीख म्हणून नव्याने नोंद केली होती. अटक केल्यानंतर जॅक्सन दाडेलला पुढील कारवाईसाठी मडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या खून प्रकरणातील दुसरा आरोपी रुडॉल्फ गोम्सला पोलिसांनी सात वर्षानंतर अटक केली होती. फरारी झालेल्या इतर संशयितांना देखील अटक करण्यात आली. तसेच, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कोठडीच्या सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com