Goa News: देवाचे स्थलांतर होते तेव्हा... पर्वरीचा राखणदार, उड्डाणपूल आणि वाद

Porvorim Flyover Issue: वडाच्या झाडाचे स्थलांतर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर प्रशासनाने रविवारी त्याची अंमलबाजणी करण्यास सुरुवात केली.
Porvorim Flyover Issue
PorvorimDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: गोवा आणि वाद हा विषय काही नवा नाही. पर्वरीत उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या मार्गात अडथळा ठरणारे २०० वर्षे जुने वडाच्या झाडाचे स्थलांतर करण्यावरुन रविवारी वाद झाला. याचवेळी येथे असणाऱ्या राखणदार खाप्रेश्वराचे मंदिर देखील स्थलांतर करण्यास सुरुवात केल्याने स्थानिक, राजकीय नेते आक्रमक झाले. पोलिस स्थानिक भिडल्याने पर्वरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पर्वरीत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारण्यात येत आले. गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी या उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात झाली. दरम्यान, या उड्डाणपुलात अडथळा ठरणारे वडाच्या झाडाचे स्थलांतर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर प्रशासनाने रविवारी त्याची अंमलबाजणी करण्यास सुरुवात केली. यावरुन स्थानिकांंनी घटनास्थळी एकत्र होत याला विरोध केला. याचवेळी खाप्रेश्वराचे देखील स्थलांतर करण्याला स्थानिकांनी जोरदार विरोध केला.

Porvorim Flyover Issue
Khapreshwar Porvorim: खाप्रेश्वराच्या मूर्तीचे गुपचूप स्थलांतर; "आता वडाकडे अशे काय उरोंक ना" पर्वरीवासियांकडून निषेध

घटनास्थळी राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि भाविकांनी गर्दी केली. एका भाविकांनी पोलिसांनी शिवागाळ केल्याच्या आरोपावरुन त्याला ताब्यात घेतल्यानंतर प्रकरण अधिकच चिघळले. वडाचे झाड स्थलांतर करण्याचे आदेश आहेत पण, मंदिराच्या स्थलांतराचे आदेश कुठे आहेत असा जाब भाविकांनी विचारला. काँग्रेस नेते अमित पाटकर, आप नेते अमित पालेकर यांनी देखील घटनास्थळी धाव घेत सरकारला जाब विचारला. आता हिंदुत्ववादी संघटना कुठे आहेत? असा सवाल पाटकरांनी उपस्थित केला.

राजकीय नेत्यांचा आरोप

१) अमित पाटकर

"राखणदार खाप्रेश्वराचे मंदिर हलविण्याबाबत कोणताही आदेश नसताना ते हलवले जात आहे. गोव्यात भाजप सरकारच्या राजवटीत हिंदू धर्म सुरक्षित नाही. मूर्ती हलवून कुठे नेली जाणार आहे याबाबतच काही सांगितले जात नाही. मंदिराची घुमटी पाडू देणार नाही", असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

एका नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरुन पाटकांनी मामलेदारांवर प्रश्नांची सरबत्ती केली. पोलिसांनी देखील शिवगाळ केल्याचे म्हणत त्या पोलिसावर देखील कारवाई करण्याची मागणी पाटकरांनी केली.

Porvorim Flyover Issue
Khapreshwar Temple: पर्वरीच्या राखणदाराला हटवू नका! भाविकांना अश्रू अनावर; श्रीदेव खाप्रेश्वर मूर्ती स्थलांतरणामुळे वातावरण तंग

२) अमित पालेकर

कोर्टाचा आदेश नसताना गोवा पोलिसांच्या मदतीने भाजपने आमचा देव अक्षरश: देवळातून कापून हटवला. हिंदूंसाठी ही शर्मची बाब आहे. देव आणि देऊळ हटविण्याचे आदेश नसून, भाजप गोमंतकीयांशी खोटं बोलतंय. भाजपचा खोटेपणा आज सिद्ध झाला. तुमचे सनातन धर्मासाठीचे प्रेम फक्त राजकारणाच्या सोईसाठी आहे, असा आरोप अमित पालेकर यांनी केला आहे.

Porvorim Flyover Issue
Porvorim Banyan Tree: 200 वर्षांचे 'आयुष्य' वाचवण्याची शर्थ! स्थलांतराने वडाचे आयुष्य धोक्यात?

३) मनोज परब

भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीसाठी आहे. भाजप स्वत:च्या फायद्यासाठी काहीही आणि सगळ्या गोष्टी नष्ट करु शकते. देव खाप्रेश्वर सोडणार नाही. आरजी ने सुरु असलेल्या या गोष्टींबाबत पूर्वीचा इशारा दिला होता, असे आरजीचे प्रमुख मनोज परब म्हणाले.

दरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास देव खाप्रेश्वराला जागेवरुन हटविण्यात आले. वडाच्या झाडाचे देखील सोमवार सकाळपासून स्थलांतराला सुरुवात झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देताना देव खाप्रेश्वराचे वडाच्या झाडाजवळच पुन्हा मंदिर उभारले जाईल, असे आश्वासन दिले आहे. तर, याप्रकरणावरुन विनाकारण राजकारण सुरु असल्याचे मत स्थानिक आमदार रोहन खंवटे यांनी मांडले.

पर्वरीत काम सुरु असलेल्या उड्डाणपुलामुळे येथील नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन धारकांची सुटका होणार आहे. अलिकडेच केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com