वयाच्या २२ वर्षी तुमचा पगार किंवा कमाई किती असा प्रश्न एखाद्याने विचारला तर?.... जास्तीत जास्त २० किंवा २५ हजार रुपये असे साधारण उत्तर येईल. पण बंगळुरूत राहणारा २२ वर्षांचा तरुण सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून त्याची महिन्याची कमाई ऐकून अशनीर ग्रोव्हर हे देखील अवाक झाले आहेत.
ईशान शर्मा असे या तरुणाचे नाव असून विशेष म्हणजे हा ईशान BITS गोवामधील ड्रॉपआऊट आहे.
ईशान शर्मा हा प्रसिद्ध युट्यूबर असून त्याच्या चॅनलचे सुमारे १० लाख ४० हजार सब्स्क्राईबर्स आहेत. ईशान शर्मा हा तरुणांमध्ये व्यवसाय आणि स्टार्ट अपची आवड निर्माण व्हावी यासाठी युट्यूब चॅनल चालवतो. देशभरातील विविध क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक, स्टार्ट-अपचे संस्थापक या चॅनलवरील व्हिडिओ पॉडकास्टमध्ये सहभागी होतात.
ईशान शर्माच्या पॉडकास्टमध्ये अशनीर ग्रोव्हर, Oxyzo Financial Services चे सहसंस्थापक आणि सीईओ आशिष मोहपात्रा, Niamh Ventures चे संचालक सार्थक आहुजा, Naukri.com चे संजीव बिकचंदानी हे सहभागी झाले होते.
गप्पांच्या ओघात Content Creator Vs Starting Business हा मुद्दा निघाला. यादरम्यान ईशानने सांगितले की, मी २० वर्षांचा होतो त्यावेळा १५ लाख कमावले. गेल्या महिन्यात मी ३५ लाख कमावले.
पण माझ्यासाठी ही अडचणीची बाब आहे. मी पैसे कमावतोय पण बाहेर जाऊन स्टार्ट अप सुरू करण्याइतपत माझ्याकडे पैसे नाहीत.
ईशानच्या कमाईचा आकडा ऐकून पॉडकास्टमध्ये सहभागी झालेले सर्व जण अवाक झाले होते. अशनीर यांनी खास त्यांच्या शैलीत सांगितले, तू ऐवढा कमावतो हे आधीच सांगायचं. आम्हीच तुला प्रश्न विचारले असते.
यानंतर अशनीर म्हणाले, मी काहीही कमवत नव्हतो. तर तर आशिष मोहपात्रांनी त्यांचा पगार ३५,००० रुपया होता असं उत्तर दिले. सार्थक आहुजा आणि संजीव बिखचंदानी यांनी अनुक्रमे पाच हजार रुपये आणि दीड हजार रुपये ऐवढा पगार होता असे सांगितले.
ईशान शर्मा हा बंगळुरूचा रहिवासी आहे. युट्यूबर म्हणून पूर्ण वेळ काम करता यावे यासाठी ईशानने BITS गोवा येथील शिक्षण अर्धवट सोडले आणि बंगळुरूत परतला. वयाच्या १८ व्या वर्षी इशानने पहिले पुस्तक लिहिले होते. ईशान BITS गोवा येथे Electrical Engineering चे शिक्षण घेत होता.
ईशान आणि त्याचा मित्र सारांश आनंद यांनी MarkItUp ही कंपनी सुरू केली. मोठ्या कंपन्यांचे सोशल मीडियावरील Campaign ही कंपनी करते. गुगल, फ्लिपकार्ट, Cred अशा बड्या कंपन्यांचे सोशल मीडिया कॅम्पेन ईशानने आखून दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.