गरजवंताना धरले वेठीस, आठवड्याला केवळ ३०० रुपये!

रेल्वेमार्ग विस्तार कामासाठी वेठबिगार: जुंपलेल्या १८ कामगारांची अखेर सुटका
Image for representative purpose
Image for representative purposeUnsplash

मडगाव: देशात वेठबिगारी कधीचीच संपली असे जरी सरकारकडून सांगितले जात असले तरी सध्या गोव्यात (Goa) जे रेल्वेमार्गाच्या (Railway track) दुपदरीकरणाचे काम चालू आहे, त्याच्यासाठी वेठबिगार कामगारांचा वापर केला जात असल्याचे हैदराबाद (Hyderabad) येथील एका ‘एनजीओ’ ने उघडकीस केले आहे. या कामासाठी त्यांना प्रती आठवडा फक्त ३०० रुपये मोबदला दिला जात होता. अखेर जुंपलेल्या १८ कामगारांची आज सुटका करण्यात आली. यामध्ये एका ७२ वर्षीय वृद्धेचाही समावेश आहे.

Image for representative purpose
Goa: मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात पिडितेचा वर्षभर अमानुष छळ

नर्सिम्मा रेड्डी या हैदराबादी कंत्राटदाराने या सर्व कामगारांना आठ महिन्यांपूर्वी हैदराबाद येथील ओल्ड मेहबूब नगर या आदिवासी भागातून आगाऊ रक्कम देऊन कामाला आणले होते. पहिले दोन महिने त्यांना शिमोगा येथे कामाला जुंपले नंतर त्यांना गोव्यात कामाला आणण्यात आले.

केपेचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ट्रॅक अँड टॉवर इन्फ्राट्रेक’ या एजन्सीसाठी त्यांना रेड्डी याने कामाला ठेवले होते. हैदराबाद येथील नॅशनल आदिवासी सॉलिडिटेरी कौन्सिल या हैदराबाद येथील आदिवासी भागात काम करणाऱ्या ‘एनजीओ’ला ही माहिती मिळाल्यावर त्यांनी गोव्यात ‘अर्ज’ या एनजीओशी संपर्क साधला. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Image for representative purpose
Goa: महिलांच्या संरक्षणात गोवा सरकार अपयशी

केंद्र सरकारच्या कंत्राटी पद्धतीवर नियमानुसार, कुणालाही कामावर घेतल्यास त्यांना दररोज ४३५ रुपये मोबदला द्यावा लागतो शिवाय त्यांना ईएसआय, प्रॉव्हिडंट फंडसारख्या सुविधा द्याव्या लागतात. मात्र या कामगारांना यापैकी कुठलीही सुविधा मिळत नव्हती. त्यांना पत्र्यांनी बांधलेल्या झोपड्यात ठेवण्यात आले होते आणि त्यांना शैचालय किंवा आंघोळ करण्याचीही काही सोय केली नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com