Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik gomantak

Goa Corona Update: राज्यात चार दिवसात चार रुग्ण दगावले, आज नवे 71 रूग्ण

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची गरज
Published on

गोव्यात मागील चार दिवसांपासून कोरोना रूग्ण दगावत आहेत. आज सलग चौथ्या दिवशी एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामूळे चार दिवसात चार रुग्ण दगावले आहेत. आज दिवसभरात 833 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 71 नव्या बाधित रूग्णांची नोंद झाली असून, 115 रुग्ण बरे झाले आहेत.

(Goa reported 71 new cases and one covid related death on Sunday)

Goa Corona Update
मोरजीतील अतिक्रमणाने वाहतूक कोंडी वाढली

गोवा राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 55 हजार 896 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 51 हजार 34 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोव्याचा रिकव्हरी रेट 98.10 टक्के एवढा झाला आहे. सध्या गोव्यात 901 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत. तसेच आजपर्यंत 3961 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आहे.

Goa Corona Update
नोकरीच्या आमिषाने गोव्यातील युवकाला दीड लाखाला फसवले

रविवारी दिवसभरात गोव्यात 833 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. आज कोणताही नवा रुग्ण रूग्णालय दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, गणेशोत्सवाच्या तोंडावर गोव्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामूळे सतर्क राहणे आवश्यक आहे.

मागील चार दिवसांपासून रोज एक रूग्ण दगावत आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवात नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण कोरोनाचा फैलाव कमी झाला असला तरी तो पुर्णत: कमी झालेला नाही. यामूळे नागरिकांनी सामूहिकरित्या एकत्र येत असल्यास कोरोना नियमावली पाळणे हिताचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com