Goa Police: 'खाकी'ची अरेरावी; 5 पोलिसांवर कारवाई, हॉटेलमालकाला धमकी देणारा आता राखीव दलात

Goa Police Action Against Five Policemen: ‘इथे लहान मुले आहेत, शिवीगाळ करू नका,’ अशी विनंती हॉटेलमालकाने वारंवार करूनही पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विराज सावंतने पदाचा माज दाखवत अर्वाच्य भाषा वापरली.
Goa Police Action Against Five Policemen
Goa PoliceDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘इथे लहान मुले आहेत, शिवीगाळ करू नका,’ अशी विनंती हॉटेलमालकाने वारंवार करूनही पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विराज सावंतने पदाचा माज दाखवत अर्वाच्य भाषा वापरली. हॉटेलचे बिल देण्यावरून सावंत यांनी मालक आणि तेथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली आणि शिवीगाळही केली.

पोलिस प्रशासनाने तातडीने सावंत यांची पर्वरीतून हकालपट्टी करून त्याची रवानगी राखीव पोलिस दलात केली आहे तसेच त्याच्यावर खातेनिहाय चौकशी सुरू आहे. याशिवाय इतर प्रकरणांतील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. ‘इतर हॉटेल कमी पैसे घेतात, तू जास्त पैसे का घेतोस?’ असा अजब तर्क सावंत यांनी लावला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ‘मी तुझे हॉटेल बंद पाडेन आणि तुला थेट पोलिसांच्या गाडीत घेऊन जाईन!’ अशी धमकी दिली.

Goa Police Action Against Five Policemen
Goa Assembly Business Bill: रोजगारासाठी उद्योजकांना पायघड्या; विधानसभेत 'व्यवसाय सुलभता विधेयक' विरोधकांच्या गदारोळात मंजूर

या घटनेनंतर पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आणि सेवा नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध शून्य सहनशीलता धोरण राबवले जाईल, असा कडक इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. तसेच कारवाईदरम्यान सर्वांना बाजू मांडण्याची निष्पक्ष संधी दिली जाईल; परंतु दोषी आढळल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.

चार पोलिस निलंबित

मुख्य लिपिक असलेल्या मुकुंद मेणकुरकरला निलंबित करण्यात आले असून, त्याची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. त्याच्यावर त्याच्या पत्नीमार्फत एलआयसी पॉलिसी खरेदी करण्यासाठी दबाव टाकण्याचा आरोप आहे. अधिकृत पदाचा वैयक्तिक फायद्यासाठी दुरुपयोग केल्याचे तपासात समोर आले आहे. कनिष्ठ लिपिक असलेल्या प्रताप सावंतलाही निलंबित करून त्याच्यावर खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिस दलात कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक होमगार्ड्सकडून पैसे उकळल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे.

वाळपई पोलिस ठाण्यात कार्यरत असताना आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप गौरेश नाईक यांच्यावर आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार प्रलंबित आहे. सुमेश मांद्रेकर यालाही एका प्रकरणात निलंबित करण्यात आले असून, त्याच्यावर खातेनिहाय चौकशी सुरू आहे. कोलवाळ पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात मांद्रेकर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अजब स्पष्टीकरण

१ पर्वरीतील घटनेबाबत पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी अजब भूमिका घेतली. सावंत हा उपनिरीक्षक असून, दुसरा त्याचा मित्र होता. ही घटना नक्की कोणत्या दिवशी घडली, हे मला माहीत नाही. सावंत त्या दिवशी ‘ऑन-ड्यूटी’ होता की नाही, हे तपासावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

२ सावंत जुलैमध्ये मोपाहून पर्वरीत आला असून त्यांच्या मित्राची चौकशी सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मात्र, सहकाऱ्याची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय या स्पष्टीकरणामुळे निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CJP Ashutosh Ranka press conference
Goa SIR Minority Targeting Claim
Bicholim
Goa Government Spending
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com