गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण रोखणारा दिवस 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा होणार, CM सावंतांची घोषणा

Opinion poll day will celebrated as Asmitai Dis: गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर तो आज एक महाराष्ट्राचा जिल्हा असता - सरदेसाई
गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण रोखणारा दिवस 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा होणार, CM सावंतांची घोषणा
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा केंद्रशासित प्रदेश व्हावा किंवा त्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे यासाठी १६ जानेवारी १९६७ रोजी देशातील एकमेव जनमत कौल पार पडला.

हा दिवस आता अस्मिताय दिस म्हणून नियमित साजरा केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबत मांडलेल्या खासगी सदस्य ठरावाला मुख्यमंत्री सावंत यांनी उत्तर दिले.

युरी आलेमाव यांनी बोलताना गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर तो आज एक महाराष्ट्राचा जिल्हा असता. जॅक सक्वेरा यांनी याप्रकरणी उठाव केला तसेच, अनेक नेत्यांनी याप्रकरणी योगदान देत गोव्याची अस्मिता जिवंत ठेवली.

त्यामुळे या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन राज्य पातळीवर १६ जानेवारी हा दिवस 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा करावा अशी मागणी केली.

यावर मत मांडताना आमदार विजय सरदेसाईंनी सत्ताधारी पक्षाला मनोहर पर्रीकर आणि मायकल लोबो यांच्या भाषणाचा काही भाग वाचून दाखवला. तसेच, गोवा आज राज्य नसते तर गोव्याचे नाव देखील गोवा नसते.

गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण रोखणारा दिवस 'अस्मिताय दिस' म्हणून साजरा होणार, CM सावंतांची घोषणा
Goa Assembly Session: निवृत्त होमगार्ड मिहिलेच्या घराची पडझड, विजय सरदेसाई आणि माजी CM कामतांची सभागृहात खडाजंगी

गोव्याचे नाव गोवापूरी किंवा गोमन्तकवाडी असे असते आणि रोहन खंवटे गोवा प्रमोट करण्यासाठी कधीच स्पेनला जाऊ शकले नसते. शिवाय ते कधीच मंत्रीही झाले नसते त्याऐवजी ते एखाद्या पंचायतीचे सरपंच असते, असे सरदेसाई म्हणाले.

युरी आलेमाव यांच्या ठरावावर उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी पर्रीकर मुख्यमंत्री असताना राज्य हा दिवस साजरा करत होते. पण, त्यानंतर काही कारणास्तव तो साजरा झाला नाही.

यापुढे मात्र तो नियमित साजरा केला जाईल, अशी घोषणा केली. तसेच, आलेमाव यांनी ठराव मागे घेण्याची विनंती केली. सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आलेमाव यांनी ठराव मागे घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com