Goa Assembly Session: निवृत्त होमगार्ड मिहिलेच्या घराची पडझड, विजय सरदेसाई आणि माजी CM कामतांची सभागृहात खडाजंगी
Digambar Kamat And Vijai SardesaiDainik Gomantak

Goa Assembly Session: निवृत्त होमगार्ड मिहिलेच्या घराची पडझड, विजय सरदेसाई आणि माजी CM कामतांची सभागृहात खडाजंगी

House Collapsed In Margao, Goa: सरदेसाईंच्या दाव्याला दिगंबर कामत यांनी आक्षेप घेतला आणि त्यांनी असे आश्वासन दिलेच नसल्याचे सभागृहात सांगितले
Published on

मडगावमध्ये निवृत्त होमगार्ड विमल शिरोडकर यांच्या घराची गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसात पडझड झाली. याबाबतचा प्रश्न फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहात उपस्थित केला.

यावेळी कामत यांनी महिलेला बांधकाम खाते घर बांधून देऊन, असे आश्वासन दिल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली. याला दिगंबर कामत यांनी आक्षेप घेत, त्यांनी असे आश्वासन दिलेच नसल्याचे सभागृहात सांगितले.

पर्यावरण आणि आपत्तीविभागाबाबत सुरु असलेल्या प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सरदेसाई यांनी फातोर्डात भिंत आणि छत कोसळून एका युवकाचा मृत्यू झाल्याचा उल्लेख केला. तसेच, मडगावात निवृत्त होमगार्ड विमल शिरोडकर यांच्या घराची पडझड झाल्याची माहिती दिली.

दरम्यान, शिरोडकरांना बांधकाम खाते घर बांधून देईल, असे आश्वासन आमदार दिगंबर कामत यांनी दिल्याचा दावा सरदेसाईंनी सभागृहात केला.

या दाव्याला दिगंबर कामत यांनी आक्षेप घेतला आणि त्यांनी असे आश्वासन दिलेच नसल्याचे सभागृहात सांगितले. पण, सरदेसाईंनी याबाबत वृत्तपत्रात वाचल्याचे सांगत त्यांना स्वप्न न पडल्याचे म्हटले.

Goa Assembly Session: निवृत्त होमगार्ड मिहिलेच्या घराची पडझड, विजय सरदेसाई आणि माजी CM कामतांची सभागृहात खडाजंगी
'गोवा महाराष्ट्राचा भाग असता तर CM सावंत एखाद्या गावचे सरपंच असते'; विरोधी पक्षनेते आलेमाव यांची खोचक टीका

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याप्रकरणात मध्यस्थी करत घराची मोडतोड झाल्यानंतर त्यांनी विमल शिरोडकर यांना संपर्क साधल्याचे सांगितले तसेच, सोय होईपर्यंत दुसरीकडे व्यवस्था करण्याचा शब्द दिला. मात्र, महिलेने नाकारल्याचे सांवत म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी अटल आसरा योजना आणखी सुटसुटीत करणार असल्याचे सांगितले. पासाळ्यात ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना मदत दिली जाईल, असेही सावंत म्हणाले.

घरांना किंवा फ्लॅट्सना नैसर्गिक आपत्तीमुळे हानी झाली असेल त्यांना आपत्ती व्यवस्थापनाकडून दोन लाख रूपये मदत सरकार करेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com