Sal River: चिंतेची बाब! साळ नदीचे अस्तित्व धोक्यात, आसपासच्या शेतीला धोका; प्रदूषणमुक्तीसाठी 'आप'चे आवाहन

Cruz Silva: पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी नदीसह सभोवतालचा परिसर प्रदूषणमुक्त करणे आवश्यक बनल्याचे मत आपचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी व्यक्त केले.
Sal River Pollution
Sal River NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दक्षिण गोव्यातील एक प्रमुख जलमार्ग असलेली साळ नदी सध्या प्रदूषणामुळे संकटात सापडली आहे. वाढते प्रदूषण, अनियंत्रित मानवी क्रियाकल्पांमुळे नदीच्या व सभोवताल असलेल्या पर्यावरणाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी नदीसह सभोवतालचा परिसर प्रदूषणमुक्त करणे आवश्यक बनल्याचे मत आम आदमी पक्षाचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी व्यक्त केले. आम आदमी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार व्हेन्झी व्हिएगस, प्रा. रामराव वाघ व सिसील रॉड्रिग्स यांची उपस्थिती होती.

सिल्वा म्हणाले की, साळ नदीत शहरी भागातील रहिवासी घरांतून, तसेच औद्योगिक आस्थापनांकडून प्रक्रिया न करता सोडला जाणारा मैला, त्याचबरोबर टाकला जाणारा घनकचरा ही नदी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे.

Sal River Pollution
Sal River: 'सासष्टी'ची जीवनदायिनी ते गटारगंगा! 'साळ' नदीची दुरवस्था रोखण्यास सरकार अपयशी

ही बाब अत्यंत चिंतेची असून, राज्यातील सर्वात जास्त प्रदूषित नदी म्हणून साळ नदीकडे पाहिले जात आहे. जल प्रदूषणामुळे मासळी, जलचरांचा मृत्यू होऊ लागला आहे. नदी प्रदूषणाचा पारंपरिक शेती व्यवसायाला ही धोका निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले.

Sal River Pollution
Sal River: करोडो रुपये जातात कुठे? पोर्तुगीजकाळापासूनचे वैभव ते गटारगंगा; प्रदूषणामुळे साळ नदीची दुरवस्था

वाळूच्या टेकड्यांचे संवर्धन करा

दरम्यान, जलस्रोत खात्याने किनारपट्टी भागातील २३ खाड्या सिंचन कायद्याखाली तत्काळ सूचित कराव्यात. किनारपट्टी भागातील वाळूच्या टेकड्यांचे संवर्धन करण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज असल्याचेही सिल्वा यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com