मोरजी: पत्रादेवी चेक नाक्यावर अबकारी विभागाचे निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या नैतृत्वाखाली 12लाख 14 हजार 880 रुपयांची दारू जप्त केली. या वाहनाची किंमत 17 लाख रूपये आहे. हे वाहन गोवा मार्गे पनवेल पत्रादेवी येथे जात होते आज सकाळी साडे सात वाजता हे वाहन पत्रादेवी कनाक्यावर पोहचले. त्यावेळी चालक आपली कागदपत्रे घेवून नाक्यावर आलाच नाही कुठे जातो असे विचारले तर उत्तर देऊ शकला नाही, वाहन तपासण्यात अधिकारी मग्न असताना वाहन चालक आपल्या वाहनांची चावी घेऊन फरार झाला.
वाहनाचे परमिट एकाचे आधार काड सापडले जे नकली होते. एम एच 16 सीसी 8200 या वाहनातून बियरचे 330 बॉक्स शिवाय विदेशी बनावटीची दारू जप्त केली. या धडक कारवाईत निरीक्षक अमोल हरवळकर , दिलीप तिळवे,निलेश गावडे,शंकर पर्येंकर, देविदास नाईक,विठोबा मालवणकर व सतीश तिळवे यांचा समावेश होता.
कोरोना काळातील हि चौथी मोठी कारवाई
या नाक्यावरून अनेकवेळा दारू चोरीचा व्यवहार चालू असतो. अबकारी विभाग हा सरकारला उत्पन्न मिळवून देणारा विभाग आहे. असे उद्गार खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागच्या वर्षी एका इमारतीचे उद्घाटन करतांना काढले होते. मात्र ज्या एका महिला अबकारी अधिकाऱ्याने गेल्या वर्षी 22 दिवसात पेडणे अबकारी विभागाला 35 लाखाची दारू जप्त करून दिली, त्याच ऑफिसर लक्ष्मीची सरकारने तडकाफडकी बदली केली होती. याविषयी पेडणे तालुक्यातून जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी किती दारू जप्त केली त्याचा तपशील द्यावा ,अशी मागणी जनता करत होती आणि आता परत एकदा अमोल यांच्या नैतृत्वाखाली 12लाखची दारू जप्त करण्यात आली.
पेडणे तालुक्यात पत्रादेवी ,आरोंदा- किरणपाणी व न्हयबाग पोरस्कडे या भागात प्रमुख तीन अबकारी नाके आहेत हे तिन्ही नाके पत्र्याच्या शेडीत उभे आहेत. मात्र हे नाके लुटारूंचे नाके म्हणून नावारूपास येत आहे . या नाक्यावरून बाहेर जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी किली जात नाही . सीमेबाहेर जाणाऱ्या वाहनातून एक क्लीनर बाहेर येतो हातात एक नोट घेवून तो चेक नाक्यावर येतो तिथे तो नोट टाकतो आणि मग वाहन न तपासता बिनधास्त निघून जाते. हे चित्र पत्रादेवी अबकारी नाक्यावर सर्रासपणे दिसून येते यावर कुणाचेही नियंत्रण नाही.
पेडणे अबकारी विभागाच्या एक महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत पत्रादेवी चेक नाक्यावर तीनवेळा धाडी टाकून किमान 32 लाखाची दारू जप्त करून सरकारच्या तिजोरीत महसूल जमा केला होता.
हि मोठी कारवाई केली असताना कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी, आमदारांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देवून त्या महिलेच्या कार्याबद्दल गौतव न करता तिची तडकाफडकी बदली केली होती.
दरम्यान मुख्यमंत्री डॉक्टर सावंत हे अबकारी इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पेडणे पोलीस स्टेशनला भेट दिली आणि केरी येथील स्थानिकाकडून एक कोटींचा अमलीपदार्थ जप्त केल्याबद्दल पोलीस निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या टीमचा गौरव केला. मात्र अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र एक प्रकारे शिक्षा का असा सवाल समाजसेवक प्रकाश कांबळी यांनी उपस्थित करून त्या अधिकाऱ्याची बदली का केली त्याची चौकशी करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले होते.
चालक पळतात कसे?
अबकारी पत्रादेवी चेक नाक्यावर बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांना पकडतात. मात्र त्या वाहनात असलेले चालक पळून जातात कसे? हे गुड मात्र आजपर्यंत कुणालाच कळलेले नाही. सात आठ अबकारी अधिकाऱ्यासोबत कर्मचारी वर्ग असताना एका चालकाला पकडू शकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.